अकोला: ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत अकोट फाईलमध्ये जुगारावर धाड; ८ आरोपींसह १.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला:

अकोला जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत धडक कारवाई केली आहे. अकोट फाईल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळा क्रमांक १८ जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी ८ आरोपींना अटक केली असून, एकूण १,२३,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.



कारवाईचा तपशील:

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांना गुप्त माहिती मिळाली होती की, अकोट फाईल परिसरातील १८ नंबर शाळेजवळ अवैध जुगार सुरू आहे. या माहितीच्या आधारे स्थागुशा पथकाने रचलेल्या जाळ्यात आरोपींना रंगेहात पकडण्यात आले.



अटक करण्यात आलेले आरोपी:

  • १) जावेद शाह लतीफ शाह



  • २) मोहम्मद सिद्दीकी मो. इशाख

  • ३) राज अभिमन्यु वाळसे



  • ४) विकास मनोहर लांजेवार

  • ५) गणेश अशोक देशमुख

  • ६) सैयद शाहरूख सै. सलीम

  • ७) सुनिल देविदास गवई

  • ८) जमीर शहा इस्माईल शाह (सर्व रा. अकोट फाईल, अकोला)

जप्त केलेला मुद्देमाल:

  • नगदी रक्कम: ₹४८,८२०/-

  • मोबाईल: ७५,००० रुपये किमतीचे ५ वेगवेगळ्या कंपन्यांचे मोबाईल

  • एकूण जप्ती: ₹१,२३,८२०/-

ताब्यात घेतलेल्या सर्व आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील कायदेशीर कारवाईसाठी अकोट फाईल पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

पोलीस पथक:

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक व अपर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत स्थागुशा पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, पोलीस उपनिरीक्षक अनिल चव्हाण, तसेच पोलीस अंमलदार शेख हसन, फिरोज खान, खुशाल नेमाडे, श्रीकांत पातोंड, धिरज वानखडे, अभिषेक पाठक, मोहम्मद आमीर आणि चालक प्रविण कश्यप यांचा सहभाग होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!