सहा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाची गोमांस व गोतस्कराविरुध्द कार्यवाही….
अकोट उपविभाग अंतर्गत पोलिस स्टेशन अकोट शहर व दहीहांडा हददीत कत्तलीकरीता जाणारे गोवंशाना दिले जिवदान व ०५ क्विंटल ६० किलो किंमतीचे १,८८,०००/- चे गोमांस केले जप्त………
आकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,आज दि(११) २०२४ रोजी सहा पोलिस अधिक्षकांचे पथकास गोपनीय माहीती मिळाली की अकोट शहर हददीतील शौकत अली चौक येथील कुरेशी पु-या मध्ये अवैधरित्या गोमांसाची विक्री होतेय अशा मिळालेल्या गोपनिय बातमी वरूण सहा पोलिस अधिक्षकांचे विशेष पथकाने व अकोट शहर पोलिस स्टॉफ ने संयुक्तीक कार्यवाही करूण वेगवेगळया ०६ ठिकाणी छापा टाकुन ०५ किंटल १० किलो गोवंश मांस किं. १,५३,०००/- रू चे जप्त करूण एकुन ०६ आरोपी यांना ताब्यात घेतले आहे.
त्याचप्रमाणे आज दि ११.०८.२०२४ रोजी पोलिस स्टेशन दहीहांडा हद्दीतील ग्राम रेल येथे विशेष पथकाने कार्यवाही करूण दोन गोवंशांना जिवदान देवुन ६० किलो गोवंश जप्त केले असुन एकुन दोन्ही कार्यवाही मध्ये १,८८,०००/- रू चे गोवंश मास जप्त करण्यात आले आहे..
सदर कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे,सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,आकोट अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अमोल माळवे अकोट शहर, पोउपनि. अख्तर शेख, पोउपनि. गणेश पाचपोर, गुन्हे शोध पथक अकोट शहर व RCP पथक यांनी केली आहे.