प्रवासी ॲटो चोरणारे ६ तासाचे आत सिटी कोतवाली पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चोरीस गेलेला प्रवासी ऑटो व  आरोपीस अटक करून १,५०,०००/- रूपये चा मुद्देमाल केला हस्तगत,पोलिस स्टेशन, सिटी कोतवाली अकोला गुन्हे शोध पथकाची कामगिरी….

अकोला(प्रतिनिधी)- सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथे दिनांक ०७/०१/२०२४ रोजी फिर्यादी नामे कलीम खान रहीम खान वय ३५ रा. बैदपुरा, अकोला यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांचा ऑटो क्रमांक एम एच ३० बि सि १७७६ किं. १,५०,०००/- रूपये चा दिनांक ०५/०१/२०२४ रोजी फतेह चौक येथुन चोरी झाल्याबाबत पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे अपराध क्रमांक ४२/२०२४ भादवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचे तपासात मिळालेल्या गुप्त बातमी वरून संशईत ईसम

१) देविदास प्रल्हाद रसाळ वय ५४ रा. उंदरी जि. बुलढाणा ह.मु. शंकर नगर, अकोट फैल, अकोला

२)सचिन कैलास सावळे वय ३५ रा. दुर्गा नगर, अकोट फैल, अकोला





यांना चौकशीकरीता ताब्यात घेतले असता त्यांनी सदरची चोरी केल्याचे कबुल केले व त्यांचे ताब्यात सदर गुन्हयात चोरी गेलेला ऑटो क्रमांक एम एच ३० बि सि १७७६ किं. १,५०,०००/- रूपये चा मिळुन आल्याने सदरचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपींना
अपराध क्रमांक ४२/२०२४ भादवि कलम ३७९ मध्ये अटक करण्यात आलेली आहे. व सदरचा गुन्हा हा ०६ तासाचे आत उघडकीस आणला आहे.
सदरची कारवाई  पोलिस अधिक्षक बच्चन सिंग , अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग सुभाष दुधगावकर यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, येथील पोलिस निरीक्षक सुनिल वायदंडे व गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी सपोउपनि एजाज खान, पोहवा प्रमोद अटाळकर,
नापोशि अमित दुबे, शेख ख्वाजा, पोशि निलेश बुंदे, अमोद दाळु,
नदिम शेख यांनी केली



महत्वाचे म्हणजे मागील दोन महिण्यामध्ये पोलिस स्टेशन सिटी कोतवाली, अकोला येथे गुन्हे शोध पथकाने



१) अप. क्रमांक ६१/२३ कलम ४५७,३८० भादवी

२) अप. क्रमांक १२५/२३ कलम ४५७,३८० भादवी

३) अप. क्रमांक २९५/२३ कलम ३७९ भादवी

४) अप. क्रमांक ३०१/२३ कलम ३७९ भादवी

५) अपराध क्रमांक ४२/२०२४ कलम ३७९ भादवी

असे एकुण ०५ गुन्हे उघडकीस आणुन एकुण २,१५,०००/- रूपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!