बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले १० गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

बार्शीटाकळी पोलिसांनी अट्टल मोटारसायकल चोरट्यास ताब्यात घेऊन उघड केले दहा मोटारसायकल चोरीचे गुन्हे,संपुर्ण मुद्देमाल केला हस्तगत….

बार्शीटाकळी(अकोला)प्रतिनिधी  – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अनेक महिन्यांपासून शहरातील प्रत्येक भागात मोटारसायकल चोरीच्या घटना घडत होत्या. मोटारसायकल चोरीच्या या वाढत्या घटनांनी शहरवासीयांची झोप उडवली होती. हे पाहता पोलिस अधीक्षक बच्चनसिंग यांनी बार्शीटाकळीचे पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांना चोरीच्या घटनांना आळा घालण्याचे व चोरीच्या घटनांचा तपास करण्याचे आदेश दिले होते





त्याअनुषंगाने पोलिस निरीक्षक शिरीष खंडारे यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला गती दिली सखोल तपास करीत असतांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार स्थानिक रमेश नगर येथील रहिवासी प्रदीप गौतम निखाडे याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता ,त्याने शहरातील काही ठिकाणाहून मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या मोटरसायकल ह्या दिग्रस (जि. यवतमाळ) येथील रहिवासी मोहसीन एस. कुद्दूस ह्याला विकायचा. नंतर मोहसीन त्या चोरीच्या मोटारसायकली इतरांना विकायचा. प्रदीप निखाडे याच्या कबुली जबाबावरून त्याचा मित्र एस. मोहसीन यालाही पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे समोर आले. आतापर्यंत बार्शीटाकळी पोलिसांनी त्यांच्याकडे दाखल १० प्रकरणातील १० ही गुन्हे उघडकीस आणले .बाईक चोरांकडुन १३ मोटारसायकली जप्त केल्या आहेत ज्याची किम्मत ६,५८००० रुपये एवढी आहे.बार्शीटाकळी पोलिसांनी बाईक चोर गॅंगचा म्होरक्या गुलाब नौरंगाबादी रा.दिग्रस ह्याला अटक करून बार्शीटाकळीत आणले . सध्या तो पोलिस कोठडीची हवा खात असून ,त्याच्याकडून आणखी काही बाहेर येते का हे तपासात कळेल



सदरची कामगिरी पोलिस अधिक्षक बच्चनसिंह ,अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे ,उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ,बार्शीटाकळी पोलिस निरीक्षक शिरिष खंडारे,सफौ शेख फराज़,पोहवा राजु जौंधरकर, नागसेन वानखड़े, पंकज पवार, मनीष घुगे ,ईश्वर पातोंड यांचा समावेश होता.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!