अकोट शहर पोलिसांची गोवंश कत्तल करुन गोमांस विक्री करणार्यावर मोठी कार्यवाही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोट शहर पोलिसांची अवैधरित्या गोवंशाची कत्तल करुन त्याचे मांसाची विक्री करणार्यावर मोठी कार्यवाही, ५.५ क्विटल गोमास सह  १,१०,५००/- रू चा मुद्देमाल केला जप्त ….

अकोट(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,नुतन पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यात सुरु असलेले अवैध धंदयांचे समुळ उच्चाटन करण्याकरीता ऑपरेशन प्रहार” मोहीमे  सुरु केली व तशा कडक सुचना सर्व प्रभारींना देण्यात आल्या त्याअंतर्गत पोलिस स्टेशन हद्गीतील गोवंश तस्करी तसेच गोंमास विक्री करणारे यांचेवर कार्यवाही उद्देशाने आज दि २२ जुन २०२५ रोजी पोलिस निरीक्षक अमोल माळवे यांच्या आदेशाने पोउपनि वैभव तायडे, पोउपनि अविनाश मोहीते, डि.बी पथक व पंच असे कुरेशीपुरा मध्ये जावून दुरून पाहणी केली असता काही इसम कूरेशीपुरा येथे जुनेद अहमद जहूर अहमद याचे घरात गोवंश जनावरांची कत्तल व तुकडे केलेले दिसुन आले.





पंचासमक्ष नमुद इसमावर छापा कार्यवाही  केली असता सदर इसमांजवळ गौमासचे काही तुकडे, गोटा व गोवंश कत्तलीसाठी सुरा अश्या साहित्यसह दिसुन आले. आरोपी १) अब्दुल नहीम अब्दुल रहीम वय ४३ वर्ष रा. कसाबपुरा अकोट २) जुनेद अहमद जहूर अहमद वय ३५ वर्ष रा. शौकतअली चौक अकोट ३) शेख असलम शेख महबुब वय २९ वर्ष रा. ठाकुर मल्ला, शौकतअली चौक अकोट यांचे कडून १) अंदाजे ५५० किलो गोवंश मास अं. किं. १,१०,०००/-रू २) एक लोखंडी सुरा किं अं १००/- रू ३) दोन लाकडी दांडा असलेल्या कु-हाड किं अं ४००/- रु ४) लाकडी ठोकडा किं अं ००/- रू असा एकुण १,१०,५००/- रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने नमुद आरोपी यांना पोलिस स्टेशन ला आणून त्यांचेवर  महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा १९७६ सुधारीत कलम ५, ५ (क), ९ (अ) प्रमाणे  त्यांचे विरूध्द गुन्हा नोंद करून आरोपीना ताब्यात घेण्यात आले.



सदरची कार्यवाही  पोलिस अधीक्षक अर्चित चांडक,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे, सहा. पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी अकोट अनमोल मित्तल  ठाणेदार पोलिस स्टेशन अकोट शहर अमोल माळवे यांचे मार्गदर्शनाखाली डिबी पथकाचे पोउपनि वैभव तायडे,.अविनाश मोहिते, पोहवा गणेश सोळंके,बजरंग इंगळे,नरेंद्र जाधव,गजानन राठोड, नापोशि विपुल सोळंके,पोशि अश्विन चौव्हाण,पोशि नितेश सोळंके,शिवशंकर गावंडे, मपोशि अपेक्षा खारोडे,पदमिनी येरनाळे यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!