
शेअरच्या नावाखाली आर्थिक फसवनुक गुन्ह्याची उकल करण्यात सायबर पोलिसांना यश,अहमदाबाद येथुन दोन आरोपींना घेतले ताब्यात…
पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथील ६४ लाख रु च्या आर्थिक फसवणूकीच्या गुन्हयामधील दोन आरोपींना सायबर सेल पोलिसांनी गुजरात येथून घेतले ताब्यात,४.५० रु तक्रारदारास मिळाले परत….
अकोला(प्रतिनिधी) – दिवसेदिवस जवळपास रोजच कुठल्या कुठल्या स्वरुपात सामान्य माणसांची आर्थिक फसवनुक घडतांना दिसते त्यातच अकोला शहरात एका प्रकरणाची भर पडली याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि ०७ फेब्रुवारी २०२४ रोजी अकोला येथील वैद्यकिय व्यावसाईक डॅा जयंतीलाल दुल्लभजी वाघेला, वय ७६ वर्षे, व्यवसाय डॉक्टर, रा. सिव्हील लाईन, अकोला यांनी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली की, त्यांना अज्ञात व्यक्तीने फोन करून शेअर मार्केट ट्रेडींग मध्ये गुंतवणूक केली की जास्त नफा मिळवून देईल असे आश्वासन त्यांनी दिले.


त्त्यानुसार त्यांनी अज्ञात व्यक्तीवर विश्वास ठेवून ६४,५०,०००/- रु येवढ्या रकमेची गुंतवणूक केली. त्यानंतर फिर्यादी यांनी नफ्याबाबत अज्ञात व्यक्तीस विचारणा केली असता फिर्यादीस उडवाउडवी ची उत्तरे दिली व आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. तेव्हा फिर्यादीस आपली फसवणूक झाल्याचे समजले त्यानुसार त्यांनी पो. स्टे. सिव्हील लाईन येथे अप क. ११४/२०२४ कलम ४०६, ४१९, ४२०, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपास सुरु केला. त्यानंतर सदर तपास हा तत्कालीन पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने सायबर पोलिस स्टेशन यांचेकडे सोपविण्यात आला.

त्यावरून तपासी अधिकारी यांनी तक्रारीचा सखोल विश्लेषण करून फिर्यादीचे ६,४१,२२१/- रूपये संबंधीत बॅकेस सांगुन गोठविले. व मा. न्यायालयातून ४,५०,०००/- रू. रक्कम ही गोठविलेल्या खात्यामधून तक्रारदारास प्राप्त करून देण्यात आली आहे. सदर गुन्हयाच्या पुढील तपासात दि १०/०७/२०२५ रोजी पोलिस स्टेशन सिव्हील लाईन येथून पोउपनि सागर फेरण तसेच पो. हवा. अजय राऊत, तसेच सायबर सेल येथून पो. हवा. गजानन केदारे, पो. हवा. अतुल अजने, पोशि गोपाल ठोंबरे असे पोलिस अधिक्षक अर्चित चांडक यांचे आदेशाने अहमदाबाद, गुजरात येथे रवाना होऊन सदर ठिकाणी आरोपींचा शोध घेतला असता यातील आरोपी (१) कांझीकुमार वल्लभभाई गुडालिया वय २८ वर्षे, रा. अहमदाबाद, गुजरात व (२) चिराग भरतभाई गुडालिया वय २६ वर्षे, रा. अहमदाबाद, गुजरात यांना स्थानिक पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेऊन व संबंधीत कोर्टातून ट्रान्झीट वॉरंट मिळवून प्रथम वर्ग न्यायालय, अकोला येथे हजर केले असता सदर आरोपींना मा. न्यायालयाने दिनांक १५/०७/२०२५ पर्यंत पोलिस कस्टडी दिली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अर्चित चांडक, अपर पोलिस अधिक्षक चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली सायबर सेल च्या सहा. पोलिस निरीक्षक मनिषा तायडे, पोउपनि सागर फेरण पो. स्टे. सिव्हील लाईन अकोला, पो. हवा. अजय राऊत पो. स्टे. सिव्हील लाईन अकोला, तसेच सायबर सेल येथून पो. हवा. गजानन केदारे, पो. हवा. अतुल अजने, पो.शि गोपाल ठोंबरे यांनी केली आहे.


