
अकोला येथील सुप्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर हल्ले प्रकरणातील मुख्य फरार आरोपीस LCB ने अकोला येथुन घेतले ताब्यात….
प्रसिध्द बिल्डर रामप्रकाश मिश्रा यांचेवर प्राणघातक हल्ला करणारा फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने कन्हान नागपुर येथुन घेतले ताब्यात….
अकोला येथील प्रसिध्द बांधकाम व्यवसाईक यांचेवर खुनी हल्ला करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….

अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ३०/०८/०२०२४ रोजी यातील फिर्यादी व जखमी रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा वय ५५ वर्ष रा. माधव नगर, गौरक्षण रोड अकोला. यांनी पोलिस स्टेशन खदान अकोला येथे तक्रार दिली की, ते नागपुर येथून अकोला त्याचे राहते घरी रात्री १०:०० वा सुमारास परत आल्यानंतर ते त्यांचे कार्यालय समोर वाहनातुन उतरत असतांना अज्ञात दोन ईसमांनी त्यांचेवर मोटारसाययकल वर येवून धारदार चाकुने जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करून हल्लेखोर पसार झाले होते

अशा तक्रारदार रामप्रकाश बन्सलोचन मिश्रा यांचे तक्रारीवरुन पोलिस स्टेशन खदान अकोला येथे अपराध नं ६२८/२४ कलम १०९, ३(५) भा. न्या. सं प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता सदर गुन्हयातील हल्लेखोर हे अज्ञात असल्याने पोलिस अधिक्षक. बच्चन सिंह यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या, त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांनी सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि गोपाल जाधव यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गठीत करून पथकाला गुन्हा उघडकीस आणण्या बाबत मार्गदर्शन केले.त्यावरुन तपास पथकातील अधिकरी आणि अंमलदार यांनी घटनेचे वेळी उपलब्ध असलेले सी. सी. टी. व्ही फुटेज तसेच तांत्रिक बार्बीचा व गोपनीय बातमीदार यांचा वापर करून, गुन्ह्याचा तपास करून त्यामध्ये जखमी रामप्रकाश मिश्रा यांचे वर हल्ला करणारा ईसम पवन विठ्ठल कुंभलकर वय ३१ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क २ कन्हान जि. नागपूर यांने त्याचे साथीदाराचे साथीने गुन्हा केल्याचे निष्पन्न करूण आरोपी पवन विठ्ठल कुंभलकर, वय ३१ ११ वर्ष रा. श्रीकृष्ण भगवान चौक वार्ड क र कन्हान जि. नागपूर यास यापुर्वी अटक करण्यात आली असून त्याचा साथीदार मंगेश उर्फ दादा तोताराव सावरकर रा. मिर्ची बाजार, जयभीम चौक, इतवारी नागपूर यास नागपूर येथून क्राईम युनिट ५ नागपूर, याचे मार्फत ताब्यात घेण्यात आले. असून आरोपीस पुढील तपास कामी पो. स्टे खदान, अकोला यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कामगिरी ही पोलिस अधिक्षक. बच्चन सिंह,अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे,स्थागुशा पोलिस निरीक्षक.शंकर शेळके यांचे मार्गदर्शनात सपोनि. विजय चव्हाण, पोउपनि. गोपाल जाधव, पो. अमंलदार दशरथ बोरकर, अब्दुल माजीद, रविंद्र खंडारे, महेंद्र मलिये, वसीमोद्दीन शेख, अविनाश पाचपोर, गोकूल चव्हाण, शेख अन्सार, भिमराव दिपके, अशोक सोनोने, राहुल गायकवाड, तसेच चालक मनिष ठाकरे यांनी केली आहे.


