स्थानिक गुन्हे शाखेच्या दिवसभरातील कार्यवाहीने अवैध दारु विक्रेत्यांचे धाबे दणाणले…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेची गावठी हातभट्टीवरील ४ थी मोठी कारवाई होळी सणाचे दिवशी एकुण ९६,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत…

अकोला(प्रतिनिधी) – आगामी येणा-या लोकसभा निवडणुक २०२४ तसेच होळी सणाच्या अनुषंगाने पोलिस अधिक्षक अकोला  बच्चन सिंह ,अपर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली
स्था.गु.शा. अकोला चे प्रभारी अधिकारी पो. नि. शंकर शेळके यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे स्था. गु. शा. अकोला येथील नेमलेले पथक मुर्तीजापुर उपविभागात अवैध दारू विक्री करणारे तसेच गावठी हातभट्टीवर दारू तयार करून विक्री करणा-यांविरुध्द कारवाई करणेकामी पथकास मिळालेल्या गुप्त माहितीवरून पो.स्टे.
मुर्तीजापुर ग्रामीण हद्दीमधील ग्राम लाखपुरी येथील पुर्णा नदीकाठी छापा कारवाई केली असता ओमप्रकाश बैजनाथ कैथवास वय ५० वर्ष रा. ग्राम लाखपुरी ता. मुर्तीजापुर जि. अकोला हयाचेकडुन प्लास्टिक टाकीमध्ये गाळलेले सडवा मोहा ९०० लिटर किंमत ९०,००० /- रू व गावठी हातभट्टीची दारू एकुण ३० लिटर किंमत
६,०००/- असा एकुण ९६,०००/- रु. चा मुद्देमाल आरोपीकडुन हस्तगत करून आरोपीस नमुद मुद्देमालासह पुढील कायदेशिर कारवाईकामी पो.स्टे. मुतीजापुर ग्रामीण यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक बच्चन सिंह,अपर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला पो.उप.नि. गोपाल जाधव व स्थानिक गुन्हे शाखा अकोला येथील पोलिस अंमलदार दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, अन्सार अहेमद, लिलाधर खंडारे व चालक पोलीस अंमलदार विजय कबले यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!