गांजाची तस्करी करणारा माना पोलिसांचे ताब्यात,१४० किलो गांजा केला जप्त…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

माना पोलिसांनी पकडला  141 किलो ग्रॅम गांजा,ट्रकसह एकुन 
53,66,600/- रू. किमतीचा मुद्देमाल केला जप्त….

माना(अकोला)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येणारा होळी सण तसेच लोकसभा निवडनुक यांचे अनुषंगाने पोलिस अधिक्षक बच्चन सिंग यांनी सर्व प्रभारिंना आपआपले पोलिस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यावर  कार्यवाही करण्याचे व परीसरात नाकाबंदी तसेच गस्त करण्याचे आदेश दिले होते





त्याअनुषंगाने दिनांक 19/02/2024 रोजी 09.00 वा. चे सुमारास पोलिस स्टेशन, माना परिसरात पेटोलिंग करत असतांना माना फाटया जवळ अमरावती कडुन मुर्तिजापुरकडे जाणा-या एन एच
53 रोडवर टाटा कंपनी चा 10 टायर ट्रक क. डब्लु बी 23 डी 7237 हायवे च्या कडेला उभा दिसला व ट्रक च्या बाजुला एक इसम संशयास्पदरित्या उभा दिसला त्याच्या बाजुला जमिनीवर पिवळया रंगाच्या भरलेल्या 04 गोण्या / पोते दिसुन आले म्हणुन माना पोलिसांनी शासकीय वाहन थांबवुन सदर इसमाजवळ जावुन त्याला त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव पिंटु कृष्णा
दास रा. कलकत्ता असे सांगितले. सदर गोण्यांमध्ये गांजा असल्याचा संशय आल्याने लागलीच एनडीपीएस कायदयातील तरतुदीचा अवलंब करून आरोपी नामे पिंटु कृष्णा दास रा कलकत्ता
याचे ताब्यातुन चार गोण्या मधील एकुण 141 कि.ग्रॅ.330 ग्रॅम गांजा, प्रति किलो 20,000 रू प्रमाणे एकुण किंमत 28,26,600/- रू चा गांजा जप्त केला तसेच आरोपी कडे असलेला व्हिओ कंपनीचा
मोबाईल किं.40,000/-रू, गुन्हयात वापरलेला टाटा ट्रक क्र. डब्ल्यु बी 23 डी 7237 किमंत 25,00,000/-रू. असा एकुण 53,66,600 /- रू. चा मुद्देमाल गुन्हयात जप्त करून पुढील तपास
माना पोलिस करीत आहे
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  बच्चन सिंह साहेब, अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलिस अधिकारी मनोहर दाभाडे  यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुरज सुरोशे, ठाणेदार पो.स्टे माना, पोउपनि गणेश महाजन, पोहवा उमेश हरमकर,पोशि पंकज वाघमारे,नंदकिशोर हिरूळकर, जयकुमार मंडावरे  यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!