
महावितरण च्या ॲल्यमिनियम विद्युत तारांची चोरी करणारी टोळीस दहीहांडा पोलिसांनी केले जेरबंद,७ गुन्हे केले उघड…
महावितरण कंपनीच्या तारांची चोरी करणारी टोळी गजाआड,
तब्बल 6 आरोपी अटक, 02 दुचाकीसह 128000/- रु.चा मुददेमाल जप्त ,07 गुन्हयाची उकल करण्यात दहिहांडा पोलिसांना यश….
दहीहंडा(अकोला) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक- 11/12/2023 रोजी महावितरण कंपनीची केळीवेळी फिडर मध्ये 14 इलेक्ट्रिक पोलवरचे सुमारे 280 किलो अॅल्युमिनिअम ची तार चोरी गेली असल्याबाबत महावितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी तक्रार नोंदविल्यावरुन अज्ञात इसमांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
त्यांनतर लगेचच दिनांक-15/12/2023 रोजी चोहोटटा बाजार येथुन 120 किलो अॅल्युमिनियम तार चोरी गेल्याबाबत दुसरा गुन्हा नोंद करण्यात आला. लगातार महावितरणच्या तारचोरीचे
दोन गुन्हे दाखल झाल्याने पोलिस अधिक्षक,अप्पर पोलिस अधिक्षक यांनी सदरचे गुन्हे तात्काळ उघड करणेबाबत निर्देश दिल्याने सहाय्पक पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी अकोट अनमोल मित्तल यांचे मार्गदर्शनात पोलिस स्टेशन दहिहांडा चे ठाणेदार सपोनि योगेश वाघमारे, पोउपनि अरुण मुंढे यांनी एक तपास पथक नेमुनण अशा प्रकारच्या यापूर्वी झालेल्या गुन्हयाचा सखोल अभ्यास करुन त्याबाबत गोपनिय यंत्रणा यांचे
मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित इसम नामे-


1) अमोल दिनकर वघे वय-22 वर्षे
2) चेतन सुभाष मेहेंगे वय-23 वर्षे

3) रोशन दादाराव रामचौरे वय 21 वर्षे

4) राहुल संजय मेहेंगे वय 21 वर्षे
5 ) नागेश राजु सुलताने वय-19 वर्षे 5 महिने
6) विकास गजानन रामचौरे वय 21 वर्षे
सर्व रा.नखेगाव ता. अकोट जि. अकोला यांना ताब्यात घेतले असता सदर संशयितांनी सदर लगातार झालेले दोन गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यावरुन सदर आरोपिंना अटक करुन मा. न्यायालयासमक्ष हजर करुन त्यांचा पोलिस कोठडी रिमांड मंजुर करुन घेउन त्यांचेकडे आणखी सखोल चौकशी केली असता त्यांनी पोलिस स्टेशन दहीहांडा हददीमध्ये यापुर्वी दाखल झालेले चार गुन्हे व पोलिस स्टेशन उरळ हददीत एक गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
गुन्हयातील आरोपींकडुन त्यांनी गुन्हे करतेवेळी वापरलेल्या दोन मोटारसायकली किंमती 65000/- रुपये आणि त्यांनी संगणमताने चोरलेली तार विकुन मिळविलेली रक्कम – 63000/- रुपये असे एकुण-128000/- रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत करून सदर
आरोपींकडुन एकुण 7 गुन्हयांची उकल केली आहे. तसेच सदर सहा अटक आरोपींना मा. अतिरिक्त सत्र न्यायालय अकोट यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली. तसेच सदर गुन्हातील पाहिजे असलेले दोन आरोपी
1) अर्जुन रविंद्र मुंडाले 2 )योगेश रामराव मुंडाले दोन्ही रा. नखेगाव यांनी पो.स्टे उरळ हददीत पोलिस वाहनावर झालेल्या गोळीवारामध्ये यापुर्वी अटक आहेत. पुढील तपास दहिहांडा पोलिस करित आहेत.
सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक बच्चनसिंह , अप्पर पोलिस अधिक्षक अभय डोंगरे साहेब, सहा. पोलिस अधिक्षक अनमोल मित्तल साहेब यांचे मार्गदर्शनात दहिहांडा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सपोनि योगेश वाघमारे, पोउपनि अरुण मुंढे, स.फौ. अरुण घोरमडे, पोहवा सुदेश यादव,कमोद लांडगे,अनिल भांडे,नंदकिशोर
चोपडे,सुरेश ढोरे,विनोद साळवे, राजेश राठोड, नापोशि विजयसिंह
चव्हाण, पोशि रामेश्वर भगत, मनिष वाकोडे, योगेश करनकार, राहुल
खंडवाय तसेच चालक सफौ-महाजन, पोहवा सुधीर कोरडे, पोशि सतिश राठोड, हेमंत दासरवार यांनी केली.


