विजेची ॲल्यमिनियम तार चोरणारी मोठी टोळी अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात,१५ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अकोला – सवीस्तर व्रुत्त असे की अकोला जिल्ह्यातील बाळापूर उपविभागात मागिल काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विद्युत तार (ॲल्युमीनीयम) चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे त्या भागातील सर्व सामान्य लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास  व सरकारी मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते,
सदर घटना ह्या शेतातील विद्युत मोटारींना विद्युत पुरवठा करणाऱ्या लाईनवर घडत होत्या. या चोरीच्या घटनांची उकल करण्या बाबत  पोलिस अधीक्षक ,अकोला यांनी स्थानिक गुन्हे शाखा  अकोला यांना आदेशीत केले होते त्यानुसार. पोलिस निरीक्षक. शंकर शेळके, स्थागुशा यांनी त्यांचे अधिनस्त स्थागुशा अधिकारी अंमलदार यांना विद्युत तार चोरीचे गुन्हे बाबत सविस्तर माहीती घेवून आरोपीतांचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. या बाबत ०२ पथकाचे नेमनुक करण्यात आली होते.पोलिस निरीक्षक शंकर शेळके स्थागुशा.  यांच्या आदेशावरून सपोनि.  कैलास डी. भगत यांनी सदर विद्युत तार चोरीच्या अनुषंगाणे आरोपी निष्पन्न करने बाबत स्थागुशा, अंमलदार आणि गोपनिय बातमीदार यांना या बाबत माहीती
जमा करण्याबाबत सांगितले होते. या दरम्याण गोपनिय बातमीदार मार्फत खात्रीशीर माहीती मिळाली की की, फुकटपुरा
अकोला येथील ईसम नासीर खान निसार खान याने चोरीचे विद्युत तार (अॅल्युमीनीयम) हे अकोला शहरात विक्री केली आहे. सदर ईसम हा त्याचे साथीदारांसह पारस, बाळापूर, या परिसरातुन चोरीचे अॅल्युमीनीयम विद्युत तार त्याच्या मालकिच्या चारचाकी मालवाहू वाहनाने घेवून येवुन अकोला शहरात त्याने विक्री केली आहे. या बाबत संशयीत इसमांची माहीती प्राप्त करण्यात आली होती. तसेच या बाबत तांत्रीक माहीती प्राप्त करण्यात आली. गुप्त बातमीदारामार्फत मिळालेली माहीती व तांत्रीक माहीती वरून विद्युत ताराच्या चोरी बाबत काही संशयीत नावे निष्पन्न झाली होती. यामध्ये बाळापूर तालुक्यातील कोळासा, मांडोली या भागातील काही ईसम होते. गुप्त माहीती वरून व तांत्रीक तपासावरून संशयीत

१) उमेश गुलाब सोळंके वय ३५ वर्ष रा. ग्राम कोळासा ता. बाळापूर जि. अकोला पो.स्टे बाळापूर





२) निलेश प्रकाश अंभोरे वय ३५ वर्ष रा. चिंचोरी गणु ह.मु ग्राम
कोळासा, ता. बाळापूर जि. अकोला पो.स्टे बाळापूर



३) सचिन उर्फ डि.जे रामराव वानखडे वय २३ वर्ष रा. मांडोली, ता.
बाळापूर जि. अकोला पो.स्टे बाळापूर



४) मिलींद गजानन डाबेराव वय २६ वर्ष रा. ग्राम कोळासा ता. बाळापूर जि. अकोला पो. स्टे बाळापूर

यांना स्थागुशा पथक यांनी चौकशी कामी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्याण त्यांनी गुन्हयाची कबुली दिली, त्यांनी बाळापूर तालुक्यातील पारस व परिसरात त्या ठिकाणी त्या भागत रात्रीच्या वेळी त्या भागातील पोल वरील ॲल्युमीनीयम चे विद्युत तार कापून त्याची चोरी करून सदर तार अकोला येथील ईसमांना विकल्याचे सांगितले, तसेच त्यांचे सोबत

५) सुरज भिमराव सिरसाठ वय २७ वर्ष रा. ग्राम कोळासा ता. बाळापूर जि. अकोला पो.स्टे बाळापूर

६) प्रविण गुलाबराव वानखडे वय २६ वर्ष रा. ग्राम कोळासा ता. बाळापूर जि. अकोला पो.स्टे बाळापूर

हे ईसम असल्याचे सांगितले. आरोपी चोली तार ही अकोला येथील आरोपीतांनी घेतल्याचे निष्पन्न झाल्याने अकोला येथील

७)नासीर खान निसार खान वय २३ वर्ष रा. फुकट पुरा खैरमोहम्मंद प्लॉट अकोला,

८) शेख इमराण गुलाम नबी वय ३३ वर्ष रा. खैरमोहम्मंद प्लॉट नेहरू नगर, अकोला

९) नईम खान नासीर खान वय ३० वर्ष रा. गुलजार पुरा, अकोला

१०) गुलाम सादीक गुलाम दस्तगीर वय ३८ वर्ष रा. खैरमोहम्मंद प्लॉट नेहरू नगर, अकोला

११) सैयद वजीर सैयद नजीर वय २७ वर्ष रा. खैरमोहम्मंद प्लॉट अकोला

यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी वर नमुद आरोपी क्रमांक ०१ ते ०६ च्या मदतीने विद्युत तारांची चोरी करून सदर तार हे अकोला येथील भंगार व्यवसायीक

१२) मोहम्मंद शहजाद मोहम्मंद ईस्लामोद्दीन वय ३२ वर्ष मुळ रा. हाजीपूरा सरवट जि.मुजफ्ट नगर उत्तर प्रदेश ह.मु.वाशिम बायपास अकोला

१३) मोहम्मंद वसीम मोहम्मंद फारूख वय ३० वर्ष मुळ रा. हाजीपूरा सरवट जि. मुजफर नगर उत्तर प्रदेश ह.मु.वाशिम बायपास अकोला

१४) आरिफ मलीक अखतर मलीक वय २३ वर्ष मुळ रा. मेरठ लकीपुरा गल्ली नं २३ मेरठ ह.मु. सुभाष चौक अकोला

यांना विकल्याचे सांगितले, त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी सदर चोरीचा माल विकत घेतला. सदर माल चोरीचा आहे. हे माहीती असतांना सुध्दा त्यांनी सदर माल विकत घेवून आरोपीतांना चोरी करण्यास मदत केली आहे. यातील आरोपीतांना ताब्यात घेतले असून त्यांनी दिलेल्या कबुली वरून एकुण १५ गुन्हे त्यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. या गुन्हयात त्यांनी चोरलेली विद्युत
ॲल्युमीनीयम तार वजन अं ४०० किलो कि १,००,०००/-रु, विद्युत अॅल्युमीनीयम तार विक्री करून मिळालेल्या रक्कमेपैकी नगदी एकुण २,१५,०००/-रू आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेले ०२ दुचाकी क्रमांक एम. एच ३० क्यु. १२७५, एम. एच ३०. बीपी. ९७६९ एकुण कि १,२०,०००/-रू आणि चोरलेला तार वाहतुक करण्यासाठी वापरलेली चारचाकी गाडी क्रमांक एम. एच. ४८. अजी. ४५१३ कि अं ४,००,०००/-रू आणि गुन्ह्यात वापरलेले मोबाईल असा एकुण ९,००,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर सदर आरोपी यांना पुढील कार्यवाही कामी पोलिस स्टेशन बाळापूर यांचे ताब्यात देण्यात येणार असून, संपूर्ण गुन्हे हे पोलिस स्टेशन बाळापूर मधिल असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक  संदीप घुगे,अपर पोलिस अधीक्षक  अभय डोंगरे, पोलिस निरीक्षक  शंकर शेळके स्थागुशा अकोला यांचे मार्गदर्शनाखाली स्थानीक गुन्हे शाखा अकोला चे सपोनि  कैलास डी. भगत, पोउपनि गोपाल जाधव, पो. अमंलदार गणेश पांडे, राजपालसिंग ठाकुर, सुलतान पठाण, रविंद्र खंडारे, भास्कर धोत्रे, महेंद्र मलिये, अविनाश पाचपोर, अब्दुल माजीद, विशाल मोरे, एजाज अहेमद, भिमराव दिपके, राहुल गायकवाड, आशिष आमले, स्वप्नील चौधरी, चालक प्रशांत कमलाकर, प्रकाश लोखंडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!