पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांवर गोळीबार करणारे सर्व आरोपीस स्थागुशा व उरळ पोलिसांनी केली अटक…..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

पोलीसांच्या गाडीवर गोळीबार करणारे पाचही आरोपींना अटक
त्यांचेकडून दोन गावठी भरमार बंदुक हस्तगत,उरळ पोलिसांची कामगिरी….

उरळ(अकोला) प्रतिनिधी. – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. ३१/१२/२०२३ रोजी पोलिस शिपाई दिनकर इंगळे हे त्यांची पोलिस स्टेशनचे काम संपऊन शासकीय वाहन सेकंड मोबाईल क्र एम एच ३० एच ५४९ चालक पोलिस शिपाई नितेश मुंढे यांचे सह पो स्टे परिसरात नाईट पेट्रोलींग ड्युटी करीत असतांना  मध्यरात्रीचे सुमारास ०२/४० ते ०२/५० वा दरम्यान ग्राम मांजरी फाटा ते कंचनपुर रोड येथे त्यांना दोन मोटार सायकल वर चार इसम संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने त्यांनी शासकिय वाहनासह नमुद मोटार सायकल चा पाठलाग केला असता एक मोटार
सायकल वरील पाठीमागे बसलेल्या इसमाने त्याचे पाठीवरील लांब शस्त्र काढून पाठीमागे न पाहता लांब शस्त्रामधुन फायर केला होता.     त्यावरुन दिनांक. ३१/१२/२०२३ रोजी पोलिस शिपाई दिनकर इंगळे यांचे फिर्याद वरून पोलिस स्टेशन ला दोन मोटार सायकल वरील चार अज्ञात इसमा विरुध्द अप नं ४३२ / २३ क ३५३, ३३६, ३४ भादंवि सह क. ३, २५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता व सदर गुन्हयाचे तपासात कलम ३०७ भा.द.वि.चे वाढविण्यात आले. सदर गुन्हयाचा तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गोपनीय माहीतीचे आधारे पाच इसमांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केला असल्याची कबुली
दिल्याने नमुद आरोपी





१) अश्विन गणेश मुंडे वय २१ वर्ष



२) भावेश उर्फ अर्जन रविंद्र मुंडाले वय १९ वर्ष,



३) अविनाश भिमराव मुंडाले वय २६ वर्ष,

४) योगेश रामराव मुंडाले वय २६ वर्ष, सर्व रा. ग्राम नखेगाव ता. अकोट जि. अकोला,

५) सागर ज्ञानेश्वर चौके वय २५ वर्ष रा. नेर धामणा ता. तेल्हारा जि.
अकोला

यांना स्थानिक गुन्हे शाखा पथकाकडून ताब्यात घेउन त्यांना दि. १४/१/२०२४ रोजी अटक करण्यात आली असुन त्यांचा मा. विद्यमान न्यायालय यांचेकडून दिनांक दि.२०/०१/२०२४ पर्यंत पोलिस कोठडी रिमांड मिळाला. आरोपी पोलीस कोठडी दरम्यान नमुद आरोपीतांकडून त्यांनी गुन्हयात वापरलेले दोन गावठी भरमार बंदुका तसेच दोन टॉर्च हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सदरची कार्यवाही ही पोलिस अधीक्षक बच्चन सिंह,  अपर पोलिस
अधीक्षक अभय डोंगरे, सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी गोकुळ राज यांचे मार्गदर्शनाखाली सदर कामगीरी  पोलिस निरीक्षक शंकर  शेळके स्थानिक गुन्हे शाखा, स.पो.नि. कैलास भगत स्थानिक गुन्हे शाखा, पो.उप.नि. गोपाल जाधव स्थानिक गुन्हे शाखा स.पो.नि. गोपाल ढोले, पो. हवा.
अनिल येन्नेवार, शिवानंद मुळे, मेहमुद खान, नापोशि अशोक पटोकार, इम्रान खान, पोशि निखील माळी,  नंदकिशोर तांदळे, हरिहर इंगळे चालक   गणेश खुपसे सर्व पोलिस स्टेशन उरळ यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!