नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशानुसार जिल्ह्याभरात राबविले जाणार वाहतुकीच्या नियमासंबंधीत विशेष मोहीम…
नुतन पोलिस अधिक्षक श्री बच्चन सिंग यांचे आदेशाने शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला तर्फे अकोला जिल्हयात फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत अनाधिकृत हस्तक्षेप करणा-या चालकांच्या वाहनांवर राबविण्यात आली विशेष मोहीम…..
अकोला(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हयामध्ये नविन रूजु झालेल पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांचे
संकल्पनेतुन व पोलिस निरीक्षक सुनिल किनगे वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे मार्गदर्शनात शहर वाहतुक नियंत्रण शाखा, अकोला व अकोला जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन हद्दीत फॅन्सी नंबर प्लेट व वाहनाच्या संबंधीत सायलेन्सर अधिक आवाज करणारे चालकांच्या वाहनांवर कलम ५०/१७७, ५१/१७७ व कलम १९८ मोवाका प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणारे वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता संपुर्ण अकोला जिल्हयात दिनांक ०३/०१/२०२४ ते ०६/०१/२०२४ दरम्यान विशेष मोहीम
राबवीण्यात आली.
सदर मोहीम दरम्यान शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला व जिल्हयातील सर्व पोलिस स्टेशन मधील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे कडुन फॅन्सी नंबर प्लेट व विशिष्ट लिखान असलेले उदा.- काका, दादा, मामा इत्यादी लिहीलेले वाहनांवर एकुण १०३१ केसेस करून ५,१५,५०० रू दंड आकारण्यात आला. तसेच वाहनाच्या संबंधीत अधिक आवाज करणारे सायलेन्सर असलेले बुलेट वाहनांवर ५७ केसेस करून ५७०००/- रू दंड आकारण्यात आला. मोहीमे दरम्यान जिल्हा नांदेड येथील पोलिस स्टेशन भाग्यनगर येथुन दिनांक ३०/१२/२०२३ रोजी चोरी गेलेली बुलेट क्रमांक MH 26 BM 2797 ही पो.स्टे. एम.आय.डी.सी येथे पकडण्यात आली व पोलिस स्टेशन एम.आय.डी.सी. येथे कार्यवाही करण्याकरीता डिटेन करण्यात आली आहे.
तसेच पुढील आठवडयात विना हेल्मेट दुचाकी वाहन चालविणारे चालकांवर विशेष मोहीम घेवुन कार्यवाही करण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी वाहन चालवितांना आढळून आल्यास चालकाला ५००रू दंड आकारण्यात येईल व लायसन्स निलंबन करण्याची कारवाईला तोंड दयावे लागणार आहे.
करीता नागरीकांनी दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करावा व सोबत वाहनांचे कागदपत्रे बाळगावे, वाहतुक नियमांचे पालन करावे व आपले वाहनावर पेंडीग दंड असल्यास त्वरीत वाहतुक पोलिस किंवा शहर वाहतुक कार्यालय येथे भरावा, असे आवाहन बच्चन सिंग पोलिस अधीक्षक अकोला यांनी अकोला जिल्हयातील नागरीकांना केले आहे.