अवैधरित्या विक्रीस जाणारा २८ किलो गांजा रामदासपेठ पोलिसांनी छापा टाकुन घेतला ताब्यात
अकोला रामदास पेठ, पोलिसांनी जप्त केला २८ किलो १९३ ग्रॅम ओलसर गांजा,आरोपींसह एकुण कि. ४,२२,८९५/-रू चा मुद्देमाल केला जप्त….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस निरीक्षक मनोज बहुरे पोस्टे रामदासपेठ, अकोला यांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीती वरून दि.(२१) रोजी अकोट स्टॅन्ड चौक अकोला परीसरात एक ईसम दोन पांढ-या रंगाच्या बॅगमधे गांजा विक्री करिता बाळगुन घेवुन जाणार आहे अशा खात्रीलायक बातमी वरून सापळा रचुन कार्यवाही केली असता आरोपी
शेख इक्राम शेख रशिद वय ३० वर्ष रा. पोळा चौक, डॉ. धनजकार यांचे घराजवळ, अकोला ह.मु. यास्मीन नगर, जमील कॉलनी जवळ, नागपुरी गेट, अमरावती
याचे ताब्यातुन दोन पांढ-या रंगाचे बॅगमध्ये २८ किलो १९३ ग्रॅम ओलसर गांजा एकुण कि. अं. ४,२२,८९५/- रू चा मुद्देमाल मिळुन
आल्याने पो.स्टे रामदास पेठ, अकोला येथे अप.क १०२/२०२४ कलम ८(क), २०(ब) एनडीपीएस अॅक्ट प्रमाणे दाखल करून तपास सुरु केलाय . सदर गुन्हयात आरोपी यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास सुरु आहे
सदरची कार्यवाही बच्चनसिगं, पोलिस अधीक्षक अकोला,अभय डोंगरे, अप्पर पोलिस अधीक्षक अकोला,सतिष कुळकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग अकोला यांच्या
मार्गदर्शनाखाली मनोज बहुरे पोलिस निरीक्षक पोस्टे रामदासपेठ, अकोला व पोलिस स्टाफ सपोनि किशोर पवार,परीविक्षाधीन पोउपनि प्रदिप जोगदंड,सफौ सदाशिव सुळकर,पोहवा शेख हसन शेख अब्दुल्ला,किरण गवई,विजय सावदेकर,तोहीदअली काझी, पोशि शाम मोहळे,आकाश जामोदे,अतुल बावने,शिवाजी धोत्रे,संतोष सुराशे, मपोशि पुजा येंदे,माधुरी लाहोळे सर्व नेमणुक पोस्टे रामदासपेठ अकोला यांनी केली आहे.