
बाळापुर हद्दीतील रेकॅार्डवरील सराईत गुन्हेगारांना अकोला पोलिस अधिक्षकांनी केले हद्दपार…
गुन्हेगारी टोळयांवर आळा बसण्यासाठी टोळीने गुन्हे करणा-या पाच जणांच्या टोळीला अकोला जिल्हायातुन १ वर्षाकरीता केले हद्दपार………
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अकोला जिल्हा अंर्तगत टोळीने गुन्हे करणा-या गुन्हेगारी टोळयांवर आळा बसावा याकरीता पोलिस स्टेशन बाळापुर चे प्रभारी अधिकारी यांनी पोलिस स्टेशन हद्दीतील टोळीने गुन्हे करणारे गुन्हेगार (१) सचिन उर्फ डी. जे. रामराव वानखडे वय २३ वर्ष (२) मिलींद गजानन डाबेराव वय २६ वर्ष दोन्ही रा. कोळासा ता. बाळापुर जि. अकोला (३) गुलाम सादीक गुलाम दस्तगीर वय ३८ वर्ष रा. खैर मोहम्मद प्लॉट, नेहरू नगर, अकोला (४) सैयद वजीर सै. नजीर रा. खैर मोहम्मद प्लॉट नेहरु नगर, अकोला (५) आरीफ मलीक अखतर मलीक वय २३ वर्ष रा. मेरठ ह.मु. सुभाष चौक, अकोला


यांचेवरील गुन्हयांची मालिका पाहता त्यांचे विरुध्द कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये अकोला जिल्हयातुन हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस अधिक्षक बच्चन सिंग
यांचे कडे सादर केला होता. त्या अनुषंगाने दि. ३०/०५/२०२४ रोजी पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी नमुद गुन्हेगार यांना अकोला जिल्हयातुन १ वर्षाकरीता हद्दपार केल्याबाबत आदेश पारीत केले असुन नमुद या ०५ गुन्हेगारांना अकोला जिल्हयातुन एक वर्षा करीता हद्दपार करण्यात आले आहे.

पोलिस अधिक्षक बच्चन सिंह यांनी अकोला जिल्हयात कायदा व
सुव्यवस्था अबाधित राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारी टोळयांची माहिती संकलीत करण्यात आदेश दिले असुन त्यांचे विरुध्द वरील प्रमाणे प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे सुरू आहे.



