
कुख्यात गुंड राहुल रंधवे यास अकोला पोलिसांनी MPDA कायद्यान्वये केले स्थानबध्द…
अकोट फाईल, अकोला येथील कुख्यात गुंडास एम. पी. डी. ए. कायद्यान्वये एक वर्षाकरीता केले स्थानबध्द….
अकोला(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,रामदास मठ, अकोट फाईल, अकोला येथे राहणारा कुख्यात गुंड


राहुल मोहन रंथवे, वय २३ वर्षे,

याचे वर यापुर्वी घातक हत्यारांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोचवणे, दुखापत, हमला करण्याची पूर्वतयारी करून नंतर
गृह-अतिक्रमण करणे, शांतताभंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, जिवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी करणे, घातक शस्त्रांचा वापर करून दुखापत करणे, जबरी चोरी करतानां इच्छापूर्वक दुखापत करणे, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करून कुठल्याही कारवाईस जुमानत नसल्याने त्याचे विरूध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंड राहुल मोहन रंधवे, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव मा. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. मा. जिल्हादंडाधिकारी, श्री. अजित कुंभार यांनी सर्व कायदेशीर
बाबींची पडताळणी करून कुख्यात गुंड हा धोकादायक व्यक्ती असल्याची खात्री झाल्याने त्यास एक वर्षा करीता अकोला
जिल्हा कारागृहात कुख्यात गुंडाविरूध्द एमपीडीए कायदया अंर्तगत स्थानबध्द आदेश पारीत केले
मा. जिल्हादंडाधिकारी, सा. अकोला यांचे आदेशावरून राहुल मोहन रंधवे, यास सदरचा आदेश तामील करून त्यास दिनांक २३ रोजी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले.
सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता पोलिस अधीक्षक, बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक, अभय डोंगरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, शहर उपविभाग, अकोला,. सुभाष दुधगांवकर, स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलिस निरीक्षक शंकर शेळके, पोहवा ज्ञानेश्वर सैरीसे, पोशि उदय शुक्ला यांनी तसेच पो.स्टे. अकोट फाईल, अकोला येथील पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कडु, पोउपनि. फुलउंबरकर यांनी परिश्रम घेतले. अकोला जिल्हयात कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहुन शांतता रहावी याकरीता अशा प्रकारचे गुन्हे करणारे व कारवाईस न जुमानणा-या सराईत गुन्हेगारांची माहीती येणा-या निवडणुका तसेच आगामी काळात सन-उत्सवाचे अनुषंगाने संकलीत करण्यात आली असुन काही गुन्हेगांराविरुध्द एम. पी.डी.ए. अॅक्ट खाली कार्यवाही प्रस्तावित आहे.



