अमरावती: ५६ टन अवैध रेती वाहतूक करणारा १४ चक्का ट्रक जप्त, २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow


अमरावती, दि. ३० ऑक्टोबर २०२६: अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात अवैध वाळू आणि रेती चोरी करून वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. या आदेशाचे पालन करत गुन्हे शाखा युनिट-१ चे पोलीस निरीक्षक  दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत तब्बल ५६ टन अवैध रेती वाहतूक करणारा १४ चक्का ट्रक पकडला आहे.

कशी झाली कारवाई?

दिनांक २९ ऑक्टोबर २०२६ रोजी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गाडगेनगर हद्दीतील राजपूत ढाबा ते लालखडी रोडवरील व्हैली लॉनजवळ एक १४ चक्का ट्रक (क्रमांक MH 27/BX9123) थांबवण्यात आला. अमरावती तहसील कार्यालयाच्या मंडळ अधिकाऱ्यांच्या सह, या ट्रकची पंचांसमक्ष पाहणी केली असता, हा ट्रक कोणतीही अधिकृत परवानगी किंवा रॉयल्टीशिवाय अवैdeply रीत्या रेतीची वाहतूक करत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी ट्रकचा चालक, कंडक्टर आणि मालकाविरुद्ध गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.



ताब्यात घेण्यात आलेले आणि फरार आरोपी:

या प्रकरणी पोलिसांनी खालील व्यक्तींविरुद्ध कायदेशीर कारवाई केली आहे:



१. जेनुल आबेदीन अब्दुल कयुम (वय ३६ वर्षे, रा. ग्राम पोरगव्हान, ता. मोर्शी, जि. अमरावती)



२. शफिक खान रफीख खान (वय ५९ वर्षे, रा. अलीम नगर, कब्रस्थान जवळ, अमरावती)

३. रिजवान हुसेन शौकत हुसेन (वय ४३ वर्षे, रा. अन्सार नगर, अमरावती) – फरार



४. अब्दुल अलिम अब्दुल गणी (वय ३० वर्षे, रा. मस्केट दवाखान्याच्या बाजूला, अमरावती) – फरार

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल:

कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून खालीलप्रमाणे एकूण २३,००,८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे:



  • ट्रक (क्र. MH 27/BX9123): किंमत अंदाजे २२,००,०००/- रुपये

    अंदाजे ५६,००० किलो (५६ टन) वाळू/रेती: किंमत अंदाजे १,००,८००/- रुपये

    मार्गदर्शन व कामगिरी करणारे पथक:

सदर धडक कारवाई पोलीस आयुक्त  राकेश ओला, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) यशवंत सोळंके, पोलीस उपायुक्त (परिमंडळ-२)  शाम घुगे, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) श्रीमती प्रांजल सोनावने आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) निलेश ब्राम्हणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखेचे वपोनि दिनेश दहातोंडे, वपोनि  अतुल वर, सपोनि मनिष वाकोडे, सपोनि दशरथ आडे, सपोउपनि फिरोज खान, पोहेका मकेश लोखंडे, संभाजी केंद्रे, संजय भारसाकळे, सय्यद नाझीमोद्दीन, पोना सचिन भोयर, पोशि रंजीत गांगडे, नरेश मोहरील, सुरज चव्हाण, सागर ठाकरे, निखिल गेडाम, चालक चेतन शर्मा आणि प्रभात पोकळे यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!