अट्टल घरफोड्यास युनीट १ ने घेतले ताब्यात
अमरावती गुन्हे शाखा युनीट १ ने घरफोडीच्या गुन्ह्यातील सराईत आरोपीला केली अटक…
अमरावती (शहर प्रतिनिधी) – गुन्हे शाखा युनीट १ ने जलदगतीने कौशल्यपूर्ण तपास करून घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी सैयद तौसीफ सैयद आसीफ (वय 23) रा.रहेमत नगर गल्ली नंबर 3 अमरावती या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक करून त्याच्याकडून 27200/- रु. मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादी मयूर रमेशराव विघे, रा.गोपगव्हान पुनर्वसन,अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भा.दं.सं. कलम 457 आणि 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला होता.
या बाबत अधिक माहिती अशी की, यातील फिर्यादी हे गोपाल नगर येथे बहीणीकडे भाऊबीज करीता जावुन घरी परत आले असता घराचे समोरील दाराचे कुलुप तुटलेले झाडाच्या कुंडीत पडलेले दिसले तसेच घरात जावुन पाहीले असता आलमारीचे ड्रॉवर मध्ये ठेवलेले नगदी, सोन्याचे व चांदीचे दागीणे असा 72,700 रू. चा माल कोणीतरी अज्ञात चोराने फिर्यादीच्या घराचे कुलूप तोडुन आत प्रवेश करून चोरून नेले. अशा फिर्यादीच्या जबानी रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट १ अमरावती हे करत असताना गुप्त बातमीदाकडून मिळालेल्या माहीती वरून रेकॉर्डवरील आरोपीला ताब्यात घेऊन गुन्हा उघड करून त्याच्याकडून कानातील सोन्याचे गुळे 2 कि.अं. 7000/- रु., सोन्याचे डोरल मनी 3 कि.अं. 10,500/- रु., सोन्याचे डोले 2 किं.अं. 7,000/- रु., चांदीचे १० शिक्का किं.अं. 700/- रु. चांदीच्या दोन समई 40 ग्रॅम किं.अं. 2,000/- रू.असा एकुण 27,200 रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीष देशमूख, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे, चालक अमोल बाहदरपूरे, भूषण पदमणे, रोशन माहुरे, किशार खेंगरे यानी केलेली आहे.