
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा अवैधरित्या ई सिगारेट विकणार्या दुकानावर छापा…
पोलिस आयुक्तांचे विशेष सि.आय.यु. पथकाने शासनाकडुन प्रतिबंधीत अंमली पदार्थ असलेली “ई सिगारेट (वेप) ची अवैधरित्या विक्री करणाऱ्यावर छापा….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 08 फेब्रु 2024 रोजी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने आयुक्तालय ह्वदीत अंमली “ई सिगारेट (बेप)” पदार्थाची विक्री करणा-या इसमांची माहीती काढण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना आयुक्तांचे विशेष पथकास गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, टेक्सास कॅम्प रोड या दुकानात अवैद्यरीत्या हुक्का साहीत्य तसेच ई सिगारेट (वेप) शासनाकडुन प्रतिबंधीत असेलेली तंबाखुयुक्त फ्लेवर्डसह हानीकारक पदार्थाची विक्री करीत आहे.


अशी माहीती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन तेथील मालक आशिष बाबाराव कडु वय 38 वर्ष रा. अर्जुन नगर अमरावती याच्या समक्ष दुकानाची पाहणी केली असता त्यांच्या दुकानातुन एकुन 55 नग वेगवेगळ्या कंपनीच्या इम्पोरटेड ई सिगारेट (वेप) कि.अ. 3,00,000/- रु. शासनाकडुन प्रतिबंधीत असेलेली तंबाखुयुक्त फ्लेवर्डसह मिळुन आल्याने सदरचा माल जप्त करण्यात आला. त्यास सदर शासनाकडुन प्रतिबंधीत असलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट बाबत विचारपुस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. वरुन सदर इसमाने अवैद्यरीत्या शासनाने नागरिकांच्या तसेच लहान मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने बंदी घातलेल्या इलेक्ट्रॉनिक सिगारेट विक्री करीत असतांना मिळुन आल्याने त्याचे विरुध्द कलम 223 बी.एन.एस. सह कलम 4,5,7,8 प्रोहीबीशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट अँक्ट 2019 अन्वये पो.स्टे. गाडगे नगर अमरावती येथे गुन्हा नोंद करण्यात आला.असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परीमंडळ २ गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त गुन्हे कल्पना बारवकर, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे, पोलिस निरीक्षक ब्रम्हा गिरी पो.स्टे. गाडगे नगर यांच्या मार्गदर्शनात पोलिस आयुक्तांचे विशेष सिआययु पथकातील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, स.पो.नि. मनोज मानकर ,स.फौ. विनय मोहोड, पोहवा सुनिल लासुरकर, ना.पो.शि. अतुल संभे, पो.शि. राहुल देंगेकर, विनोद काटकर, निलेश जुनघरे, गजानन बरडे, सुशांत प्रधान यांनी केली आहे.



