मोटारसायकल चोरट्यास बडनेरा पोलिसांनी अटक करुन,हस्तगत केल्या ६ मोटारसायकल…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

बडनेरा गुन्हे प्रकटीकरण पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातील 06 मोटार सायकल आरोपीकडुन जप्त करुन एकुण 220000/- रु  किमतीचा मुद्देमाल केला जप्त…,

बडनेरा(अमरावती शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, पोलिस स्टेशन बडनेरा येथे दिनांक 10/02/2024 रोजी फिर्यादी  मनिष रमेशलाल केवलाणी वय 32 वर्ष रा. झुलेलाल
अपार्टमेंट पवन नगर नवी वस्ती बडनेरा यांनी तक्रार दिली की त्यांनी  त्यांची मोटार सायकल क्रं. MH27CS7996 हि अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केली असता दुसऱ्या दिवशी त्यांनी पार्क केलेली त्यांची मोटार सायकल लावलेल्या ठिकाणी दिसुन न आल्याने त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोस्टे बडनेरा येथे  अप क्रं. 67/2024 क. 379 भादवि अन्वये गुन्हा दाखल करुन तपास सुरु होता





सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान ‘वरीष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट यांच्या आदेशाने तपास करीत असतांना दिनांक 13/02/2024 रोजी गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहीतीवरुन आरोपी नामे



उमेश भावराव वानखडे वय 27 वर्ष धंदा मजुरी रा. ग्राम मलकापुर ता. भातकुली जि. अमरावती



यास नमुद गुन्ह्यात अटक करण्यात आली होती अटक केलेल्या
इसमास विश्वासात घेवून बारकाईने व कसोशीने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. व त्याच्या ताब्यातुन नमुद गुन्ह्यात चोरी गेलेली मोटार सायकल सह इतर पाच मोटार सायकल ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
1) HERO HF DELUXE मोटार सायकल काळया रंगाची सिल्वर पट्टा असलेली MH27CS7996 चेसिस क्रं. MBLHA102L5J82714 इंजन क्रं. HA11EXL5J02332 किंअं 20000/- रुपये
2) HERO HONDA SPLENDER PLUS काळया रंगाची निळा पट्टा असलेली MH34Y2794 चेसिस क्रं. MBLHA10EE8HK29943 किंअं 50000 /- रुपये
3) HERO HONDA SPLENDER PRO काळया रंगाची सिल्व्हर पट्टा असलेली MH27DJ6061 चेसिस क्रं.
MBLHHA10ASDHK18943 इंजन क्रं HA10ELDHK21614 किंअं 40000/- रुपये
4) HERO SPLENDER PLUS काळया रंगाची सिल्व्हर पट्टा असलेली MH27AU5228 चेसिस क्रं.
MBLHA10AMCHH86702 इंजन क्रं. HA10EJ CHH39603 किंअं. 60000/- रुपये
5) HERO HONDA SPLENDER PRO काळया रंगाची निळा पट्टा असलेली MH31AV780 चेसिस क्रं.
01J20F44389 इंजन क्रं. 01J18E44263 किंअं 30000/- रुपये
.
6) HERO HONDA PASSION PLUS काळया रंगाची लाल पट्टा असलेली MH27W996 चेसिस क्रं. 05E0962114 इंजन क्रं. 05E08M20296 किंअं 20000/- रुपये असा कि 220000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई  पोलिस आयुक्त नवीनचंद्र  रेड्डी,पोलिस उपायुक्त परिमंडळ – 1 सागर पाटील सहा. पोलिस आयुक्त कैलास पुंडकर  यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट यांचे नेतृत्वात सफौ अहमद अली ,नापोशि मंगेश परीमल,नापोशि रोशन निसंग,पोशि जावेद पटेल, पोशि विक्रम नशिबकर, राजकुमार राऊत  वचन पंडीत  यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!