
अवैधरित्या दारुची वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांचे ताब्यात….
अवैधरित्या विक्रीसाठी विनापरवाना दारुची वाहतुक वाहतुक करणारा बडनेरा पोलिसांचे ताब्यात….
बडनेरा(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १०/०३ /२०२४ रोजी पोलिस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर येथील गुन्हे प्रकटीकरण(डी.बी.) पथक हे पो.स्टे. बडनेरा हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारकडून खात्रीशीर माहिती मिळाली की, एक इसम होंडा अॅक्टीवा मोपेड पांढ-या रंगांच्या बिनाक्रमांकाच्या मोटार सायकलने देशी दारू विक्री करीता
वाहतुक करून पोलिस स्टेशन बडनेरा हद्दीतुन घेवून जात आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे राहुल सुनिल मेश्राम, वय २० वर्षे, रा. शहेनाई मंगल कार्यालयमागे, गणपती नगर, अमरावती याचेवर रेड केली असता त्याचे ताब्यातून एका प्लास्टीक पोत्यामध्ये ०२ खाकी रंगांचे पृष्ठाचे बॉक्स ज्यामध्ये एका बॉक्समध्ये ४८ नग देशी दारू बॉबी संत्रा प्रत्येकी १८० एम.एल. सिलबंद बॉटल किं.अं. ३,३६० /- रू. व एका बॉक्समध्ये १०० नग देशी दारू बॉबी संत्रा प्रत्येकी ९० एम.एल. सिलबंद बॉटल किंमत ३,५००/- रू. तसेच एक होंडा कंपनीची अॅक्टीवा मोपेड पांढ-या रंगांची बिनाक्रमाकांची मोटार सायकल किं.अं. ५०,००० /- रू. असा एकूण
५६,८६०/-रूचा मुद्देमाल मिळून आल्याने जागीच पंचासमक्ष जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त
परिमंडळ ०१ सागर पाटील सहाय्यक पोलिस आयुक्त कैलास पुंडकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन बडनेरा, अमरावती शहर चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पुनित कुलट, पोउपनि तुषार गावंडे, सफौ अहेमद अली,पोहवा मंगेश परिमल,नापोशि रोशन निसंग ,पोशि अभिजीत गावंडे,पोशि विशाल पंडीत, विक्रम नशिबकर, जावेद पटेल राजकुमार राऊत यांनी केली आहे.




