
पोलिस कर्मचारी याचे खुनाचा गुन्हे शाखेने ६ तासाचे आत केला उलगडा,आरोपी अटकेत….
सहा.फौजदार अब्दूल कलाम यांचे मारेकरी सहा तासाचे आत गुन्हे शाखा युनीट १ ने केले जेरबंद,वैयक्तिक वादातुन केला खुन…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २८ जुन २०२५ चे सायंकाळी पो.स्टे गाडगेनगर हददीत वलगाव रोडवरील नवसारी भागात अमरावती शहर पोलिस दलात वलगाव पोलिस स्टेशनला कार्यरत असलेले सहा फौजदार अब्दूल कलाम याचा अपघात झाल्यावी बातमी गुन्हे शाखा युनीट १ ला प्राप्त होताच गुन्हे शाखेचे अधिकारी हे तात्काळ घटनास्थळावर गेले असता एक दुचाकी व चारचाकी वाहन हे क्षतीग्रस्त असल्यावे दिसुन आले यावरुन जखमींना बेस्ट हॉस्पीटल येथे नेले असल्याची माहीती प्रात झाल्याने लागलीच बेस्ट हॉस्पीटल येथे गेले असता सफौ अब्दूल कलाम हे अपघातात गंभीर जखमी असल्याने लागलीच त्याना इर्विन हॉस्पीटल येथे हलवन्यात आले होते.



अपघात झालेल्या घटनास्थळावर तसेच हॉस्पीटल मध्ये जमलेल्या गदीतून माहीती प्राप्त झाली कि हा अपधात नसून घात पात आहे याबाबत सविस्रतर तपास केला असता अपघात ग्रस्त गाडी हि अरफत कॉलनी येथील राहणार अहेसानउददीन याचे मालकीची असुन त्याचा मुलगा जिहाण याने त्यांवे साथीदार यांचे मदतीने सफौ अब्दुल कलाम याना जिवानीशी ठार मारण्याचे उद्देशाने अपघात करून मारहान केली असल्यावे गु्प्त बातमीद्वाराकडुव माहीती मिळाली सदर घटनेत अब्दुल कलाम यांचा खून झाल्याने व सदर प्रकरण गंभीर व अतीसंवेदनशील असल्याने लागलीच विनाविंलब पोलिस आयुक्त अरविंद चावरिया व इतर वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळास भेट देवून गुन्हे शाखेच्या पथकास योग्य मार्गदर्शन करुन सदर गुन्हातील आरोपीस तात्काळ अटक करप्याबाबत आदेशीत केले होते.

त्यानुसार गुन्हे शाखा युनीट १ चे पोलिस अधिकारी यानी सातत्याने गुन्हाबाबत माहीती प्रात करुन तसेच धटनेबाबत तांत्रीक माहीती व सिसीटिव्ही फुटेज याचे आधारावर आरोपींना निष्पन्न करुन आरोपींना मार्डी रोडवरून ताव्यात घेतले असता त्याना त्याचे नाव व पत्ता विचारले असता १) निहानउददीन अहेसानउददीन वय २२ वर्ष रा अराफात कॉलनी अपना बेकरिच्या मागे पो.स्टे नागपूरी गेट २) आवेन खॉन अयूब खॉन वय २३ वर्ष रा मोबीनपूरा दर्यापूर अमरावती असे सांगीतले तसेच त्यांचा साथीदार ३) फाजील खॉन साबीर खॉनवय २३वर्ष रा अराफत कॉलनी हा वलगाव रोड परिसरातील खाजगी हॅास्पीटल मध्ये उपवार घेत आहे.गुन्हातील दोन्ही आरोपी पुढील तपासकामी पोलिस स्टेशन गाडगेनगर यांचे स्वाधीन करप्यात आले आहे

सदर गुन्हा हा संवेदशील व गंभीर स्वरुपाचा असल्याने तसेव वरिष्ठानी गुन्हातील आरोपी निष्पन्न करून तात्काळ अटक करष्याबाबत आदेशीत केल्याने गुन्हेशाखा युनीट १ यानी त्यावे तिन टिम तयार करून घटनेपासून सातत्याने गुपतबातमीदाराकडुन, तांत्रिक माहीती व सिसीटीव्ही फुटेज च्या आधारे कोणताही ठोस पुरावा नसताना आरोपींना ताब्यात घेतले
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अरविंद चावरिया.पोलिस उपायुक्त(मुख्यालय) कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त(परिमंडळ १) सांगर पाटील,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे सहा पोलिस आयुक्त (गाडगेनगर)अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, सपोमि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, फिरोज खॉन,सतिश देशमूख, सचिन बहाळे, ‘प्रशांत मोहोड ,अलीमउददीन खतीब नाईक,पोशि नाझिमउदीन सयैद, विकास गुडदे, रणजीत गांवडे, सधिन भोयर, सुरज व्हाण,निखील गेडाम, वालक अशोक खंगार, किशॉर खेंगरे तसेच सायबर पोलिस स्टेशनचे सपोनि अनिकेत कासार पोशि निखील माहे ,अनिकेत वानखडे यानी केलेली आहे.



