गुन्हे शाखेच्या दहशतवाद विरोधी पथकाने पकडला २ लाख रु किंमतीचा गांजा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दहशतवाद विरोधी शाखेने पकडला अमरावती शहरात येणारा २ लाख रु किंमतीचा अंमली पदार्थ गांजा……

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. (29) ॲागस्ट.2024 रोजी संध्या 7.00 वा. चे सुमारास बडनेरा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पेट्रोलींग करीत असताना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकास गोपनीय माहीती मिळाली की अंगात जांभळ्या रंगाचा फुलबाहयांचा शर्ट आणि काळसर कथीया रंगाचा फुलपेंट घातलेला बंडु वानखडे नावाचा इसम बडनेरा रेल्वे स्टेशनवर आलेला असुन त्याचेजवळील नायलॉनचे पिशवीत गांजा नावाचा अंमली पदार्थ आहे.





अशा गोपनीय बातमीदाराकडून खात्रीलायक माहीती मिळाल्याने  लागलीच वरिष्ठांना माहीती देवून सदर पथकाने दोन शासकीय पंचांना सोबत घेवून मिळालेल्या माहीतीप्रमाणे सापळा रचुन कार्यवाही केली असता आरोपी बंडू पुरूषोत्तम वानखडे वय 46 वर्ष रा. गजराज नगर, एमआयडीसी अमरावती हा आपल्या ताब्यातील नायलॉनच्या मोठ्या पिशवीमध्ये गांजा नावाच्या अंमली पदार्थाने भरलेले प्लास्टीकच्या टेपपट्टीने रॅप केलेले 6 पॅकेट वाहून नेत असताना बडनेरा रेल्वे स्टेशन ते विश्रामगृह रोडवर म.न.पा. क्र. 11 उर्दू प्राथमीक मुलांची शाळा, नवी वस्ती, बडनेरा या इमारतीचे समोरील रोडवर मिळून आला.



त्याने आपल्या आर्थीक फायद्याकरीता गांजा नावाचा अंमली पदार्थ वजनी 9.995 कि.ग्रॅ कि.अं. 2,00,000 रू. चा लोकांना विक्री करीता बाळगुन वाहतुक करताना मिळून आल्याने त्यास गांजामालासह ताब्यात घेवून सखोल तपासाकरीता गुन्हयात अटक करण्यात आली. पुढील तपास पोलिस स्टेशन बडनेरा करीत आहे.



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांचे आदेशाने  यांचे आदेशाने पोलिस उपायुक्त मुख्यालय कल्पना बारवकर पोलिस उपायुक्त परीमंडळ  2 गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त परिमंडळ क्र. 1. सागर पाटील,सहा पोलीस आयुक्त गुन्हे  शिवाजी बचाटे, सहा पोलिस आयुक्त,फ्रेजरपुरा कैलास पुंडकर  यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक,गुन्हे शाखा (प्रशासन) सिमा दाताळकर स.पो.नि. योगेश इंगळे, सफौ अजय गाडेकर, पो.हवा. विजय पेठे, सुधीर सोनपरोते, इमरान अली, सुधीर गुडघे, उमेश कापडे, गजानन सातंगे यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!