दोन अट्टल घरफोड्यांना ताब्यात घेऊन युनीट २ ने उघड केला घरफोडीचा गुन्हा…
दोन अट्टल घरफोडे अमरावती शहर गुन्हेशाखेच्या ताब्यात,युनीट २ ने घरफोडीच्या गुन्ह्याची केली उकल…
अमरावती (शहर प्रतिनिधी) – अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट २ यांना मिळालेल्या गोपनीय माहिती कौशल्यपूर्ण तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर अट्टल घरफोडी करणाऱ्या दोघांना जेरबंद करून गुन्हयातील एकुण ३७,०००/- रूपयांचा मुद्देमाल हा जप्त केला आहे. या प्रकरणी फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून पो.स्टे. राजापेठ अमरावती शहर येथे अपराध क्र.४७७/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (३) भा.न्या. संहिता प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार (दि.१२ऑगस्ट) रोजी फिर्यादी सौ.सिमा दिपक साहु (वय ५३ वर्ष) रा. रविनगर, हनुमान मंदीर जवळ अमरावती यांनी तक्रार दिली की, त्य दुपारी ०२:०० वाजण्याच्या दरम्यान घराला कुलुप कोंडा लावुन सरकारी स्वस्त धान्य दुकानात धान्य आण्यासाठी बाहेर गेल्या असता. सायं. ०६:०० वाजता घरी परत आल्या असता घराचे मागील दरवाजा तुटलेला दिसला व बेडरूममध्ये जावुन पाहणी केली असता बेडरूम मधील लोखंडी आलमारीतील सोन्या, चांदीचे व नगदी पैसे असा एकुण १४,०००/- रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी अज्ञात चोरट्याने संधी साधून घरात प्रवेश करून चोरी केले आहे अशा दिलेल्या तक्रारीवरुन पो.स्टे. राजापेठ अमरावती शहर येथे अपराध क्र. ४७७/२०२४ कलम ३०५ (अ), ३३१ (३) भा. न्या. संहिता प्रमाणे अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून तपास सुरु होता
पोलीस आयुक्त यांचे निर्देशान्वये आयुक्तालय हद्दीत घरफोडी चे गुन्हयांना आळा बसावा आणि गुन्हे उघडकीस यावे त्या करीता निर्देशान्वये, गुन्हेशाखा, अमरावती शहर येथील पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे आदेशाने युनिट क्र.२ येथील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयात गुप्त बातमीदार नेमुण अज्ञात आरोपीतांचा शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदर गुन्हयाचा तपास करीत असतांना १) अभिषेक आनंदीलाल साहू (वय २१ वर्ष), रा.संतोषी नगर, अमरावती, २) रोहीत राहुल नायर (वय २४ वर्ष) रा.साहुबाग विलास नगर, अमरावती, यांना सदर गुन्हयात ताब्यात घेवुन गुन्हयासंबधाने बारकाईने व विश्वासात घेवुन सखोल विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्यावरून त्यांचे ताब्यातुन सोन्या, चांदीचे दागीने व नगदी पैसे असा एकुण कि.अं. ३,७०००/- रू चा मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.
अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती शहर यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस उपायुक्त श्रीमती कल्पना बारावकर, पोलीस उपायुक्त सागर पाटील, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे साहेब, सहायक पोलीस आयुक्त गुन्हेशाखा, शिवाजी बचाटे, पोनि. बाबाराव अवचार, गुन्हे शाखा अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि. महेश इंगाले, पोउपनि. संजय वानखडे, पोलीस अंमलदार – दिपक सुंदरकर, गजानन ठेवले, मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, संदीप खंडारे यांनी केली आहे.