IPL जुगारावर सीआईयू पथकाचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा खेळविणार्यावर पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा छापा…

अमरावती (शहर प्रतिनिधी) – वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील एका सट्टेबाजाला रविवारी दुपारी सनरायझर्स हैदराबाद आणि किंग्ज इलेव्हन पंजाब संघात खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यावर ऑनलाईन सट्टा लावताना अटक करण्यात आली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या सीआययू पथकाने रविवारी सायंकाळी 6.30 वा चे दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील श्री कॉलनीत ही कारवाई करून 1 लाख 20 हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. निलेश उर्फ जॉन्टी वसंतराव वैरागडे (वय 31 वर्ष) रा.इंदीरा गांधी वार्ड ए,पी.एम.सी. मार्केट जवळ हिंगणघाट जि.वर्धा, ह.मु. श्री कॉलनी अमरावती असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.19मे) रोजी पोलिस आयुक्त यांच्या आदेशाने पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने आयुक्तालय हद्दीत आयपीएल क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या सट्ट्यावर कार्यवाही करणे करीता पेट्रोलींग करीत असताना पथकाला गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, श्री कॅालनी अमरावती येथे निलेश उर्फ जॉन्टी वसंतराव वैरागडे हा त्याच्या घरा बाहेरील वरांड्यात सनराईस हैद्राबाद विरुद्ध किंग्स 11 पंजाब या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल फोनचे सहाय्याने आयडी (गैरकायदेशीर रीत्या बनविलेल्या ॲप) द्वारे बेटींग घेऊन सट्टा जुगार खेळून  पैश्याची बाजी लाऊन हारजितचा खेळ खेळत आहे. त्या नुसार प्राप्त माहीती वर जावुन रेड केली असता नमुद आरोपी हा सनराईस हैद्राबाद विरुद्ध किंग्स 11 पंजाब या आयपीएल क्रिकेट सामन्यावर मोबाईल मध्ये ऑल पॅनल या नावाचे ऑनलाईन बेटींग आयडी मध्ये चालु असलेल्या क्रिकेट मॅचचे भावावर फोनचे सहाय्याने बेटींग करतांना मिळुन आला.



त्यास सदर मॅचचा जुगाराचा व्यवहाराबाबत विचारणा केली असता त्याने सदरचा व्यवहार हा यवतमाळ येथील बंटी जयस्वाल याला देत असल्याची कबुली दिली. प्रथमदर्शनी नमुद सट्ट्याच्या हीशोबाची पाहणी केली असता त्याची लाखों रुपयांची उलाढाल झाल्याचे दिसुन आले. वरुन ताब्यातील आरोपी नामे 1) निलेश उर्फ जॉन्टी वसंतराव वैरागडे (वय 31 वर्ष) रा.इंदीरा गांधी वार्ड, ए पी.एम.सी. मार्केट जवळ हिंगणघाट जि.वर्धा, ह.मु. श्री कॉलनी अमरावती यांच्याकडुन  क्रिकेट सट्ट्याचे जुगार साहीत्य आय फोन 13 प्रो.मॅक्स कंपनीचा आकाशी रंगाचा मोबाईल कि.अं. 1,20,000/- रु. चा माल जप्त करण्यात आला असुन पो.स्टे. बडनेरा अमरावती शहर येथे कलम 420,465,468,471,34 भा.द.वि. सह कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



परंतु पोलिसांनी मिडीयाला किमान 12 तास गुलदस्त्यात ठेऊन मागुन सुध्दा 12 तासानंतर प्रेस नोट देण्यात आली नाही

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपाआयुक्त परीमंडळ १, सागर पाटील, पोलिस उपायुक्त परि.२ गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त(गुन्हे) कल्पना बारवकर, सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा, शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस आयुक्तांचे विशेष पथक क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी सपोनि.महेंद्र इंगळे, पोहेका. सुनिल लासुरकर, नापोशि. अतुल संभे, पोशि. राहुल ढेंगेकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!