वयोव्रुध्द ईसमास धडक देऊन पळुन जाणारे अखेर गुन्हे शाखा युनीट १ च्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गाडगेनगर हद्दीतील  HIT AND RUN प्रकरण  गुन्हेशाखा युनिट १ ने  उघड करुन वाहन आरोपींना घेतले ताब्यात…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत असे की,
पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे दि.(५)मे रोजी फिर्यादी सौ मालती भिमसेन वाहने वय ६० वर्ष रा. किशोर नगर अमरावती यानी तक्रार दिली कि त्याचे पती भिमसेन वाहने वय ६५ वर्ष हे त्याचे मोटर सायकलने समता कॉलनी कठोरा रोड येथून येत असताना दि.(३)मे  रोजी दूपारी १२.१५ वा च्या दरम्यान अज्ञात कार चालकाने
त्यांचे मोटारसायकलला धडक मारून जखमी केले





अश्या फिर्यादीच्या तक्रारीवरुन पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे अप क्र ४३८ / २०२४ कलम २७९, ३३७, ३३८ भादवी प्रमाणे नोंद करण्यात आला होता व तपास सुरू होता. सदर गुन्हातील जखमी
यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सदर गुन्हात ३०४ भादवी प्रमाणे कलम वाढ करण्यात आली होती व सदर गुन्हाचा तपास सुरू होता.



सदर गुन्हातील अज्ञात वाहनाचा पोलिस आयुक्त अमरावती शहर स्तरावरून शोध घेण्याचे कसोटीने प्रयत्न चालू होते तसेच सदर गुन्ह्यांत  तपासादरम्यान प्राप्त सि.सी.टि.व्हि फुटेज वरून सदर गुन्हातील गाडी हि टाटा कंपनीची बोल्ट असल्याबाबत तपासात निष्पन्न झाले होते. सदर गुन्ह्यातील आरोपी व गाडीचा शोध घेण्यासाठी पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यानी पोलिस आयुक्त
अमरावती शहर येथील पोलिस स्टेशन, गुन्हे शाखा व सि.आय.यु पथक यांची विशेष बैठक बोलवून तपासाचे  अनुषंगाने मार्गदर्शन करून आठ तपास पथके तयार करून आरोपी व गाडीचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते.



सदर गुन्हाचे अनुषंगाने गुप्त बातमीदार व तांत्रिक पद्धतीने तपास करून गुन्हा उघड करण्याचे कसोशिने प्रयत्न चालू होते. तसेच
प्रादेशीक परिवहन विभाग अमरावती येथून टाटा बोल्ट कंपनीच्या गाडीच्या मालकांची यादी तसेच अमरावती शहरातील गॅरेज व जुन्या गाड्या विक्री करणारे  यांचे कडे तपास चालू होता परंतू उपयुक्त माहीती मिळून येत नव्हती,पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी  यानी सदर गुन्हाबाबत माहीती देण्याबाबत प्रसार माध्यमातून जाहीर आव्हान करून माहीती देणार्याचे नाव गुप्त ठेवून त्याना बक्षीस म्हणून २०,०००/- रोख रक्कम जाहीर करण्यात आली होती.

गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्हाचा समांतर तपास करत असताना तांत्रिक माहीतीच्या आधारे व गुप्त बातमीदाराकडून माहीती प्राप्त झाली कि ग्राम नादरूल पोलिस स्टेशन येवदा ता. दर्यापूर जि अमरावती येथे एका इसमाकडे टाटा कंपनीची फोर व्हिलर गाडी असून सदर इसम हा दि.(०३) रोजी
अमरावती येथे आल्याची माहीती प्राप्त झाल्याने लागलीच दि.(३०)मे रोजी  गुन्हे शाखा युनिट १ चे  अधिकारी व अंमलदार हे ग्राम नादरूल येथे गेले असता सदर वाहन मालक याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यानी त्याचे नाव प्रशांत जनकराम बघाडे वय ३९ वर्ष व्यवसाय शिक्षक रा ग्राम नादरूल असे सांगीतले त्याला विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यानी गुन्हा केल्याचे कबूल केले तसेच त्याचे कडे टाटा कंपनीचे बोल्ट वाहन क्रं. एम.एच.२७/बिइ / ३५०९ हि त्याचे मालकीची असून दि.(३) रोजी त्याचे इतर साथीदार निखील दिनेश बघाडे वय २४ वर्ष रा नादरूल व इतर एक असे लग्न संमारभात अमरावती येथे आले होते व त्यांचे कडून अपघात झाल्याचे  सांगीतले आहे.

सदर गुन्हात आरोपी १) प्रशांत जनकराव बघाडे वय ३९ वर्ष व्यवसाय – शिक्षक रा ग्राम नादरूल २) निखील दिनेश बघाडे वय २४ वर्ष रा नादरूल ३) एक विधीसंघर्षग्रस्त बालक असे असून त्यानी टाटा कंपनीचे बोल्ट वाहन क्रं. एम. एच.२७/बिइ / ३५०९ ने अपघात केल्याचे प्राथमीक तपासात निष्पन्न झाले आहे सदर आरोपी व गाडी पुढील तपासकामी पोलिस स्टेशन गाडगेनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदर ची कारवाई पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हेशाखा कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त परीमंडळ- १ सागर पाटील, पोलिस उपायुक्त परीमंडळ – २. गणेश शिंदे , सहायक पोलिस आयुक्त गुन्हे  प्रशात राजे  यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांचे नेतृत्वात सपोनि मनीष वाकोडे, प्रकाश झोपाटे, पोलिस अंमलदार  राजूआपा बाहनकर, फिरोज खान, सतिष देशमूख, दिनेश नांदे, विकास गुडदे, सुरज चव्हान, निखील गेडाम, निवृत्ती काकड, चालक अलीमउददीन, अमोल बहादरपूरे, दिनश खेगंरे, रोशन माहूरे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!