
अखेर गणेश कोहळे खुन प्रकरणातील मुख्य आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात….
खुन करुन फरार झालेल्या आरोपीस अखेर राजापेठ पोलिसांनी घेतले ताब्यात…
अमरावती(शहर प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,, दि(२०) फेबु् रोजी फिर्यादी पवन बाळकृष्ण कोहळे यांनी तकार दिली की, त्यांचा भाऊ गणेश कोहळे हा दि. 20.02.2024 रोजी
सायंकाळी 07.30 वाजता चे सुमारास बाहेर फिरायला गेला होता. वस्तीतील लोकांकडुन तीला समजले की, त्यांचा भाऊ गणेश कोहळे हा रात्री 09.00 वा. सुमारास चवरे नगर वस्तीतील चौका जवळ उभा असतांना 01) शैलेश उर्फ पिंटु चव्हाण 02) रोहीत आसकर 03) अर्थव शैलेश चव्हाण व त्यांचे साथीदार यांनी जुन्या भाडनाचे कारणावरून तीचे भावा सोबत वाद विवाद केला. त्यामुळे तो नंदनवन कॉलनीचे दिशेन पळाला असता शैलेश चव्हाण व त्याचे साथीदाराने त्यांचा पाठलाग केला. तेव्हा तिचा भाऊ त्याचा जिव वाचविण्यासाठी साठी नंदनवन कॉलनीतील एका घरात घुसला असता त्याचेच मागे त्या घरात 01) शैलेश उर्फ पिंटु चव्हाण
02) रोहीत आसकर 03) अर्थव शैलेश चव्हाण व त्यांचे साथीदार हे सुध्दा घुसले व त्यांनी तिचे भावाला गळ्यावर, हातावर, पायावर व शरीरावर ठिकठिकाणी चाकु सारख्या शस्त्राने वार करून व सिमेंटच्या विटाने डोक्यावर मारून जिवानीशी ठार मारले.


अश्या फिर्यादीच्या तक्रारीवरुन मेडीकल रिपोर्ट वरून पोलिस स्टेशन,राजापेठ येथे अपराध क्र 116/2024 कलम 302, 143, 147, 148, 149,120 ब, 201 भादवी अन्वये दाखल करून तपास सुरु केला असता सदर गुन्हयाच्या तपासामध्ये गुन्हयातील तीन महीण्यांपासून फरार असलेला आरोपी सिध्दार्थ उर्फ शक्ती कैलास भले, वय 25 वर्षे, रा. चवरे नगर, अमरावती याला मिळालेल्या गुप्त
बातमीदाराच्या माहीती वरून ताब्यात घेवुन अटक करण्यात आली.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी, पोलिस उपायुक्त परी २ गणेश शिंदे,सहा पोलिस आयुक्त जयदत्त भवर, यांचे
मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र आंभोरे,पोलिस निरीक्षक गुन्हे, रवींद्र राजुरवार पोलिस.स्टेशन राजापेठ ,पोउपनि मिलींद हिवरे, पोहवा मनीष करपे, नापोशि रवी लिखीतकर, नापोशि पंकज खटे, गनराज राउत, विजय राउत, सचीन
मोहोड व पोशि सागर भजगवरे यांनी केली.



