मौजमजेसाठी घरफोडी करणारे सराईत गुन्हेगारांना युनीट १ ने केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

मौजमजेसाठी घरफोडी करणाऱ्या तिघांना अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने घातल्या बेड्या…. 

अमरावती (शहर प्रतिनिधी) –गुन्हे शाखा युनिट क्र.१ अमरावती शहर यांनी मध्यप्रदेश व महाराष्टातील रेकॉर्डवरील व सराईत घराफोडीच्या आरोपींना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर एकाच गावात राहून रात्री घरफोडी करून दिवसा त्याच पैशांवर मौजमजा करणाऱ्या घरफोड्यांना शिताफीने अटक करून अमरावती, चांदूरबाजार, अकोट, शेगाव, व इतर ठिकाणचे पाच घरफोडीचे गुन्हे उघड करून ५ लाख ३५ हजार रू. मुद्देमाल हा जप्त केला आहे.  आरोपीं १) तेजस संजय दरेकर (वय २२, रा.रवीनगर, कांडली, परतवाडा) २) वीरेंद्र सोभाराम नागेश्वर (वय ४०, रा.किरपाणी, बुऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) ३) अमोल सुरेश देशमुख (वय ३६, रा.मार्की, भातकुली) अशी अटक करण्यात आलेल्या घरफोड्यांची नावे आहेत.





याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट क्र.०१ अमरावती शहर चे पथक हे पोलिस आयुक्तालयाचे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुप्तबातमी दाराकडून माहीती मिळाली कि ग्राम मार्की पोलिस ठाणे वलगाव येथे अमोल देशमूख यांचे इथे काही दिवसापासून अनोळखी तिन इसम राहत असून ते रात्रीच्या वेळी बाहेर जातात व दिवसा घरी असतात व पैशाची उधळण करत आहेत. सदर माहीती खात्रीशीर असल्याने युनिट १ पथकाने  सापळा रचून मंगेश देशमूख याचे घरी (दि.२०मे) रोजी छापा घातला असता तिथे तीन  इसम मिळून आले त्यांना त्यांची नावे व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) तेजस सजंय दरेकर (वय २२) रा.रवीनगर कांडली परतवाडा पो.स्टे परतवाडा जि.अमरावती २) विरेन्द्र सोभाराम नागेश्वर (वय ४०) व्यवसाय मजूरी, रा. किरपाणी गोनखेडा ता.नेफानगर, जि ब-हाणपूर पो.स्टे. नावरा मध्यप्रदेश ३) अमोल सुरेश देशमूख (वय ३६) व्यवसाय मजूरी रा. मार्की ता.भातकूली पो.स्टे वलगाव जि.अमरावती असे सांगीतले त्याचे कडे घरफोडीचे दोन पेचकस, टॉमी, सबल असे साहीत्य मिळून आले



यांचेवर पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे फिर्यादी अभिषेक गोपाल भांनगे (वय २५ वर्ष) रा. श्री गुरु गजानन धाम रेवसा रोड यांनी (दि.१५मे) रोजी रिपोर्ट दिला कि (दि.११मे) रोजी ते घरातील परिवारासह घराला कुलूप लावून बाहेर गावी गेले व परत (दि.१५मे) रोजी घरी आले असता त्याचे घरून रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागीने असा एकून १,०२,००० रु. चा मुद्देमाल चोरी गेल्याचे फिर्यादी वरून अपराध क्र. ४६७/२०२३ कलम ४५४,४५७, ३८० भादवी प्रमाणे नोंद होता सदर इसमांना ताब्यात घेऊन त्यांचेकडे बारकाईने व विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्यांनी त्याचा इतर एक साथीदार  रोशन सरदार परतवाडा ह.मू. वलगाव (फरार) असे मिळून काही दिवसापूर्वी अमरावती येथील श्री गजानन धाम रेवसा, चांदूरबाजार, अकोट, शेगाव, तेल्हारा इत्यादी ठिकाणी चोरी केल्याचे सांगीतले. तसेच त्याबाबत सविस्तर माहीती घेतली असता आरोपी रोशन सरदार व तेजस दरेकर हे मित्र असून काही दिवसा अगोदर दोघेही अमरावती जेल मध्ये चोरीच्या गुन्ह्यात बंद होते, त्यावेळी जेलमध्ये त्यांची ओळख विरेंद्र  नागेश्वर रा.ब-हाणपूर, मध्ये प्रदेश याचे सोबत झाली होती जेल मधून सुटल्यावर विरेंद्र नागेश्वर याचे ते संपर्कात होते. काही दिवस अगोदर विरेन्द्र नागेश्वर यांनी तो गाव मार्की पूर्णीनगर येथे त्याचा मित्र अमोल देशमूख याचे घरी राहायला असल्याचे त्याने सांगीतल्याने ते त्याला भेटण्यासाठी तेथे गेले असता त्यावेळी विरेन्द्र नागेश्वर यानी सांगीतले कि अमोल देशमूख रा.मार्की याचा मोठा भाऊ खूणाचे गुन्हात जेल मध्ये आहे. त्यामूळे त्याची ओळख देशमूख याचे सोबत झाली असून अमोल देशमूख हा एकटाच घरी राहतो. त्यामूळे चौघेही गाव मार्की येथे राहत होते. दिवसा गावात राहायचे व संध्याकाळी चोरी करत असल्याचे सांगीतले आहे.



सदर गुन्हात आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाचे आदेशान्वये आरोपींना पोलिस कोठडी मिळाली असुन,आरोपींकडे सदर गुन्हाचा तपास सुरू असून त्यांचे कडून खालील गुन्हे उघड करण्यात आले आहे व अजून गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

1) पोलीस स्टेशन गाडगेनग अपराध कं. ४६७/२०२४ कलम ४५४,४५७,३८० भादवी

२) पोलिस स्टेशन चांदूर बाजार अपराध कं. ३११/२०२४ कलम ४५४,४५७,३८० भादवी

३) पोलिस स्टेशन अकोट अपराध कं. २०२/२०२४ कलम ४५४,३८० भादवी

4) पोलिस स्टेशन अकोट अपराध कं. २३२/२०२४ कलम ३७९ भादवी

५) पोलिस स्टेशन शेगाव अपराध कं. २७२/२०२४ कलम ४५७,३८० भादवी

सदर गुन्ह्यातील व इतर गुन्ह्यातील खालील मुद्देमाल हा जप्त करण्यात आला आहे.१) हिरो फॅशन प्रो ग्रे रंगाची कं. एच.एच.३०/एसि/८३५४ अंदाजे किमंत ५०,००० रु २) सोन्याचे दागीने मंगळसूत्र, कानातील, अंगठी, असा एकून ५५ ग्रॅम वजनाचे दागीने अं. कि ३,८५,००० रु ३) चंद्राचे वजन ६४ अ. कि ७०,००० रु ४) चार अँड्रॉईड मोबाईल कि.अ ४०,००० रु असा एकूण ५,३५,०००/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्या आला आहे. सदर आरोपी हे सराईत व कुख्यात घरफोडीचे आरोपी असून त्यांचे कडून अजून गुन्हे उघड होण्याची दाट शक्यता आहे.

सदरची कारवाई ही पोलिस आयुक्त, नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकार (मुख्यालय), सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा. राजूआपा, फिरोज खान, सतीश देशमूख, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, चालक रोशन माहुरे, किशार खेंगरे यानी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!