
वलगांव येथील जिनिंग कारखान्यात चोरी करणारी टोळी गुन्हे शाखा युनीट १ ने केली जेरबंद,आरोपींसह मुद्देमाल घेतला ताब्यात…
वलगाव येथील बंद जिनीग फॅक्टरी येथून इलेक्टीक मोटर व लोखडी सामान चोरीचा गुन्हा गुन्हे शाखा युनिट १ ने केला उघड,३ आरोपींसह २.४० लाखाचा मुद्देमाल केला जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि १७ मार्च २०२५ रोजी पो.स्टे. वलगांव, अमरावती शहर येथे धनराज कृष्णराव जुमळे, रा. शिराळा, जि. अमरावती यांचे तकारीवरुन शिराळा येथील रेचा व जिनिंग मध्ये टिनपत्रे कापून त्यामधील रेचा व जिनिंगचे साहीत्य एकूण १,८०,०००/-रु. चा मुददेमाल चोरीस गेल्याबाबत पोलिस स्टेशन वलगाव येथे अप क्र ६४/२०२५ कलम ३३१(३), ३३१ (४), ३०५ बि.एन.एस. प्रमाणे दाखल करण्यात आला होता.


सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनिट ०१ करीत असतांना युनीट १ चे अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हाचे घटनास्थळाला भेट दिली असता असे निदर्शनास आले कि सदर जिनीग फॅक्टरी हे बरेच दिवसापासून बंद स्थितीत आहे. त्यामूळे तक्रारदार धनराज कृष्णराव जुमळे, रा. शिराळा, जि.अमरावती यांचेकडून घटनेसंबधाने बारकाईने विचारपूस केली असता सदर मुददेमाल हा नेण्यासाठी फोर व्हिलर गाडीचा वापर करावाच लागेल असे सांगीतले

सदर गुन्हाचा तपास करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि पहाटे पहाटे चार ते पाच वेळा पिवळ्या रंगाचा लोंडीग अॅटो सदर घटनास्थळावरून गेलेला आहे. सदर माहीतीवरून सदर साधारण ५० ते ६० सिसीटीव्हि फुटेजची पाहीणी केली असता माहीती मिळाली कि सदर अॅटो हा लालखडी भागातील आहे. त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि वलगाव येथील रेकॉर्डवरिल गुन्हेगार शुभम उताने हा मागील काही दिवसापासून लालखडी भागात येत होता अश्या माहीतीवरून आज दि २० मार्च २०२५ रोजी आरोपी शुभम यास वलगाव येथून ताब्यात घेतले असता व त्याला त्याचे पूर्ण नाव विचारले असता त्यानी त्याचे नाव शुभम भाउरावजी उताने वय २८ वर्षे, रा. धनगरपूरा, वलगांव असे सांगीतले त्यास विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने वलगाव येथील जिनीग फॅक्टरी मध्ये सहा ते सात वेळा त्याचा साथीदार शरीफ खॉन उर्फ गुड्डू अजीज खॉन रा सतीनगर यानी जिनीग जिनीग फॅक्टरी मधील लोहा व मशीन चोरल्या व त्या आणण्यासाठी लालखडी येथील नुर शहा मोहमद शहा तसेच शेख अकील शेख लाल यांनी चोरलेला माल लालखडी येथे आणण्यासाठी त्यांचे लोडींग अॅटोचा वापर केला.यावरुन आरोपी शुभम व त्यांचे साथीदारांना ताब्यात घेवून गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल किंमत २.४००००/- हस्तगत करण्यात आला व पुढील तपासकामी आरोपीं १) शुभम भाउरावजी उताने वय २८ वर्षे, रा. धनगरपूरा, वलगांव, नि. अमरावती २) शरीफ खॉन उर्फ गुड्डू अजीज खॉन रा सतीनगर, वलगांव, जि. अमरावती (फरार)३ बुर शहा मोहमद शहा, वय ४४ वर्षे, रा. बिरुमीला नगर, अमरावती ४) शेख अकील शेख लाल, वय ५० वर्षे, रा. लालखडी रिंगरोड, अमरावती तसेच हस्तगत मुद्देमाल पो. स्टे. वलगांव यांच्या ताब्यात देण्यात आला.यातील आरोपी क्रमांक १ व २ यांनी जिनींग फेंक्ट्रीमध्ये प्रवेश करुन मुद्देमाल चोरी केला तसेच आरोपी कमांक ३ व ४ यांनी चोरीचा माल आपले लोडींग अॅटोमध्ये लोड करुन अमरावती येथे आणून त्याची विल्हेवाट केली.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त नवीनचन्द्र रेडडी,पोलिस उपाआयुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर मॅडम, मा. पोलीस उपआयुक्त(परीमंडळ १) सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त, (गुन्हे विभाग) शिवाजी बचाटे, सहायक पोलीस आयुक्त (गाडगेनगर विभाग) अरुण पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा सतीष देशमूख, फिरोज खान, सचिन बहाळे,अलीमउददीन खतीब, नाईक पोलीस अमंलदार विकास गुढधे, सचिन भोयर, सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक अशोक खंगार, किशोर खेंगरे, गुन्हे शाखा युनिट -०१ तसेच पो.स्टे. सायबर, अमरावती शहर चे स.पो.नि. अनिकेत कासार, पो.हवा निखील माहोरे यांनी केलेली आहे.


