किरकोळ विक्रीकरीता MD पावडरची वाहतुक करणारे युनीट २ ने,११० ग्रॅम MD पावडरसह दोघांना घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गुन्हे शाखा युनिट २ ची अवैधरित्या मॅफेडॉन (एम.डी.) ची विक्रीकरीता वाहतुक  करणा-या इसमांवर धडक कारवाई,११० ग्रॅम MD पावडर जप्त,दोघे अटकेत….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – पोलिस आयुक्त अरविंद चावरिया  यांनी अमरावती शहरातील अवैधरित्या अंमली पदार्थ विक्री, करणाऱ्या इसमांवर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेश प्राप्त झाल्यावरुन गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार त्यांचे नेतृत्वात पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार दि. २० जुलै २०२५ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे पथक हे आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पेट्रोलींग दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन खात्रीलायक माहीती मिळाली की अतिक बेग अनिस बेग रा. तालाबपुरा, अमरावती हा अंगात काळया रंगाचा लोअर पॅन्ट व टि शर्ट घातलेला दाढी असलेला त्याचे साथीदारासह अॅटो रिक्षा क्र. एम.एच-२७-बि.डब्ल्यु-१६११ मध्ये बसुन आपले जवळ अवैधरित्या मॅफेडॉन (एम.डी.) नावाचा अंमली पदार्थ स्वताच्या ताब्यात बाळगुन विक्री करण्याचे इरादयाने नेहरू मैदानात येणार आहे.





अशा खात्रीलायक माहीतीवरून गुन्हेशाखा युनिट २ चे पथकाने नेहरू मैदान येथे सापळा रचुन पो. स्टाफ च्या मदतीने नमुद ऑटोला थांबविले असता ऑटो मध्ये बसलेले इसम पोलीसांना पाहून नेहरू मैदानाच्या दिशेने पळाले पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून मोठ्या शिताफीने त्यांना ताब्यात घेतले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यानी त्यांचे नाव १) अतिक बेग अनिस बेग वय ३० वर्ष रा. तालाबपुरा, पो.स्टे. नागपुरी गेट, अमरावती, २) मोहम्मद रिजवान अब्दुल गणी वय २८ वर्ष रा.अकबर नगर पठान पानठेल्या मागे अमरावती असे सांगीतले त्यावरून त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन ११०.९८० ग्रॅम (एम.डी.) मॅफेडॉन पाउडर किं.अ. ५,३८,९५० /- रू तसेच दोन मोबाईल व ऑटोसह एकूण ७,०९,९५० /-रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करून नमुद आरोपीविरूध्द पोलिस स्टेशन कोतवाली येथे एन.डी. पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला



नमुद अटक आरोपींनी सदरची एम.डी. ही कोणाकडून खरेदी केली तसेच सदर ची एम.डी ही अमरावती शहरातध्ये कोठून आली याबाबत सविस्तर तपास गुन्हे शाखा युनिट २ कडुन  सुरू असून त्यांनाही लवकरच अटक करण्यात येईल तसेच अमरावती शहरात एम.डी. बाळगणारे त्याचे सेवन करणारे, विक्री करणारे यांचेबाबत गोपनिय माहीती काढण्यात आली असून त्यांच्यावरही नजीकच्या काळात धडक मोहीम राबविण्याबाबत मा. आयुक्त अमरावती शहर यांनी आदेशीत केले आहे.



सदरची कारवाई  पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त परी १ गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त परी २ श्याम घुगे , पोलीस उपायुक्त मुख्यालय तथा गुन्हे रमेश धुमाळ,सहा पोलिस आयुक्त गुन्हे शाखा शिवाजी बचाटे, यांचे मार्गदर्शनात गुन्हे शाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांच्या नेतृत्वात सपोनि अमोल कडू, सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोलिस अंमलदार महेंद्र येवतीकर, दिपक सुंदरकर, गजानन ठेवले, अजय मिश्रा, आस्तीक देशमुख, मनोज ठोसर, सुधीर गुडधे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, विशाल वाकपांजर, योगेश पवार, राजीक रायलीवाले, सागर ठाकरे, चेतन कराळे, संदीप खंडारे, राहुल दुधे, चेतन शमा, अनिकेत वानखडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!