
अंमली पदार्थ गांजासह दोघांना युनीट २ ने घेतले ताब्यात….
अंमली पदार्थ गांजाची तस्करी करणारे दोघे अमरावती शहर गुन्हेशाखा, युनिट 2 ने केले जेरबंद…


अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात विधानसभा निवडनुकीच्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये विधानसभा निवडणुकी दरम्यान अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच गांजा तस्करी करणारे, गुन्हेगार व गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा याकरीता पोलिस आयुक्त यांनी गुन्हेशाखेतील पथकांना विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले होते.

त्या अनुषगांने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आदेशाने गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे मार्गदर्शनात गुप्त माहीती काढुन अमरावती शहरात गांजा तस्करी करणा-या इसमांवर पाळत ठेवली.पोलिस आयुक्त.नविनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हेशाखा युनिट 2 पथक अमरावती शहर हे पोलीस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट.2 यांचे मार्गदर्शनात आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहीतीच्या आधारे दिनांक 07/11/2024 रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर अंतर्गत पंचवटी चौक येथे दोन इसम हे गांजा अमंली पदार्थ तस्करी करून त्याची विकी करण्याचे उद्देशाने येत आहे

अशा माहीती वरून पंचवटी चौक येथे सापळा रचुन गुन्हेशाखा युनिट 2 चे पथक हे सापळा रचुन थांबले असता मिळालेल्या माहीती व वर्णनाप्रमाणे दोन ईसम हे वेलकम टि पाईट कडुन पंचवटी चौकात येतांना दिसुन आल्यावरून त्यांना थांबवुन विचारपुस करून त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी 1) सादीक शहा बिसमिल्ला शहा वय 40 वर्ष रा.लालखडी, इमाम नगर, अमरावती, 2) शेख महबुब शेख रूस्तम वय 60 वर्ष रा.इतवारी बाजार वर्धा यांनी त्यांचे अंगात गांजा अंमली पदार्थ हे पांढ-या रंगाचे कापडा मध्ये गुंडाळून आणले होते ते काढुन पाहले असता त्यामध्ये 9 किलो 735 ग्राम वजनाचे गांजा अमंली पदार्थ किमंत 1,88,200/- रू चा मुद्देमाल व गुन्हयात वापरलेले दोन मोबाईल 12,000/- रूपये असा एका 2,00,200 /- रूचा मुद्देमाल जप्त करून नमुद दोन्ही आरोपीतांविरूध्द पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे कलम 20, 22, 29 कायदया अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त (परीमंडळ १) गणेश शिंदे साहेब,पोलिस उपायुक्त (परीमंडळ २) सागर पाटील, सहा पोलिस उपायुक्त(गुन्हे) शिवाजी बचाटे,यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे नेतृत्वाखाली सपोनि योगेश इंगळे, पोउपनि संजय वानखडे,पोलिस अंमलदार अजय मिश्रा, दिपक सुंदरकर, निखील माहोरे, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार, सागर ठाकरे, राहुल दुधे यांनी केली आहे.


