
सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा…
सिटी कोतवाली पोलिसांनी २४ तासाचे आत उघड केला चोरीचा गुन्हा….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि.(20) रोजी फिर्यादी नामे


संतोष वसंतराव भडके वय 38 वर्ष रा. सावनेर ता. नांदगाव खंडेश्वर जि. अमरावती

यांनी पोस्टे सिटी कोतवाली येथे फिर्याद दिली की, दि. 20/02/2024 रोजी ते व त्याचा मित्र सारंग हे दोघे त्यांचे खाजगी कामा करीता त्यांच्या निळ्या रंगाच्या कॉलेज बॅगेत नगदी
2,00,000/-रु ठेवले. व नंतर त्यांचा LI.C एजंट मित्र गजानन धाये यास LI.C चे प्रिमियम देणे असल्याने गजानन मंदीर रेल्वे स्टेशन येथे भेटले. तेव्हा त्यांनी त्यांचेकडे असलेली बँग स्वतःचे मोटर सायकला लटकावुन ते व त्याचा मित्र सांरंग, गजानन असे मंदीरात दर्शन करण्या करीता गेले व दर्शन करुन परत आल्यावर त्यांची पैशाची बँग दिसुन आली नाही. ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली अश्या त्यांचे जबानी रिपोर्ट वरुन पोलिस स्टेशन सिटी कोतवाली येथे अप क्रमांक 67/24 कलम 379 चा गुन्हा दाखल करून तपासात घेतला. तपासा दरम्यान गुप्त बातमीदाराच्या खात्रीलायक बातमीवरुन

आरोपी क्रं 1) चंदु मधूकरराव ठाकरे वय 45 वर्ष रा. बाबापुर ता. कारंजा जि.वाशिम 2) देवेंद्र जुजारामजी घाटे वय 41 वर्ष
रा. राजुरा घाटे ता. मुर्तीजापुर जि. अकोला 3) श्याम कैलाश वाळस्कर वय 37 वर्ष रा नविन बालक मंदीर जवळ स्टेशन
विभाग मुर्तीजापुर जि अकोला यांना अटक केली. त्याचे ताब्यातुन गुन्हातील चोरी गेलेले 2,00,000/-लाख रोख जप्त करुन
सदरचा गुन्हा 24 तासाच्या आत उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी अमरावती शहर पोलिस उपायुक्त परीमंडळ – 2, गणेश शिंदे,सहाय्यक पोलिस आयुक्त राजापेठ विभाग, देवदत्त भंवर वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर कोटनाके,पोलिस निरीक्षक विल्लेकर यांचे मार्गदर्शनाखाली पो उप नी अजय जाधव सफौ राजेश सपकाळ,पोहवा दिपक
श्रीवास,पोशि मंगेश दिघेकर, मोहम्मद समीर, सागर ठाकरे यांनी केली


