अट्टल घरफोडे पोलिस आयुक्तांचे सी.आय.यु.पथकाचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना अमरावती सी.आय.यु.पथकाने केली अटक….

अमरावती (प्रतिनिधी) – जिल्ह्यात घरफोड्या, जबरी चोरी यासारख्या गुन्ह्यांमध्ये गेले अनेक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना शिताफीने पकडण्यात पोलिस आयुक्तांच्या (सी.आय.यु.) पथकाला यश मिळाले आहे. पोलिस स्टेशन राजापेठ, पोलिस स्टेशन बडनेरा, पोलिस स्टेशन गाडगे नगर आणि पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा या सर्व पोलिस ठाणे हद्दीत मोटार सायकलसह घरफोडी केल्याचे विवीध गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.





(दि.13डिसेंबर) रोजी फिर्यादी  अंकुश अनंत पुसदर (वय 54 वर्ष), रा.सितारामबाबा कॉलनी, अमरावती यांनी पोलिस स्टेशनला रीपोर्ट दिला की, ते दि.02 डिसेंबर ते दि. 12 डिसेंबर रोजी पावेतो कुटुंबासह बाहेरगावी गेले होते त्यांनी परत येवुन पाहिले असता त्यांच्या घराचे कुलुप तुटलेले दिसुन आले व घरातील कपाटाचे कुलूप तोडुन कपाटातील 1) डी.एस.एल.आर. सोनी कंपनीचा कॅमेरा कि.अ. 60,000/- रु. 2) टायटन गोल्ड किमंत 1000/- रु. असा मुद्देमाल चोरी गेला असल्याबाबत रिपोर्ट दिल्याने पो.स्टे. ला अप क्र. 1020/2023 कलम 454,457,380 भा.द.वी. चा गुन्हा दाखल करुन तपासात घेतला.



सदर गुन्ह्याच्या तपासात गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा तसेच राजापेठ हद्दीतील इतर गुन्हे हे आरोपी  1) तेजस संजय दरेकर (वय 21 वर्ष), रा.रवि नगर परतवाडा अम 2) रोशन किरण सरदार (वय 27 वर्ष), रा. रवि नगर परतवाडा अम यांनी केल्याबाबत सांगीतल्याने नमुद आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचा विद्यमान न्यायालयाकडुन  तिन दिवसाची पोलिस कोठडी प्राप्त करुन त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सांगीतले की, त्यांचा एक मित्र त्यांना अमरावती शहरात राहून बंद घरांबाबत माहीती देत होता व नमुद आरोपी हे रात्री दरम्यान शहरात येवुन बंद घरांना निशाना बनवुन घरफोडी तसेच दिवसाच्या वेळी मोटारसायकल चोरी करीत होते. असे सांगितले या मध्ये आरोपींनी आयुक्तालय हद्दीतील खालील प्रमाणे गुन्ह्यांची कबुली दिली आहे.



1) पोलीस स्टेशन राजापेठ अप क्र. 1020/2023 कलम 454,457,380 भा.द.वि.,

2) पोलीस स्टेशन राजापेठ अप क्र. 971/2023 कलम 380 भा.द.वि.,

3) पोलीस स्टेशन राजापेठ अप क्र. 996/2023 कलम 457,380 भा.द.वि.,

4) पोलीस स्टेशन बडनेरा अप क्र. 875/2023 कलम 454,457,380 भा.द.वि.,

5) पोलीस स्टेशन गाडगे नगर अप क्र. 696/2023 कलम 379 भा.द.वि.,

6)पोलीस स्टेशन नांदगाव पेठ अप क्र. 466/2023 कलम 379 भा.द.वि.,

7) पोलीस स्टेशन फ्रेजरपुरा अप क्र. 1061 /2023 कलम 379 भा.द.वि. या सर्व गुन्ह्यांची कबुली दिली असुन त्याच्या कडुन 1) डी.एस एल. आर. सोनी कंपनीचा कॅमेरा कि.अं.1,00,000/- रु., 2) टायटन गोल्ड घड्याळ किमंत 1000/- रु. 3) होंडा सि.बी. शाईन सिल्वर रंगाची क्र. एम.एच. 27 सी.के. 8513 कि.अ. 50,000/- रु. 4) हीरो स्प्लेंडर क्र. एम. एच. 27 बी.एच. 8767 कि.अ. 40,000/- रु..5) होंडा ड्रीम युगा काळ्या रंगाची एम. एच. 27 सी.एच. 1063 कि.अ. 60,000/- रु. असा एकुन 2,51,000/- रु. चा माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास सुरु आहे.

सदरची कार्यवाही नविनचंद्र रेड्डी, पोलिस आयुक्त अमरावती शहर, सागर पाटील, पोलिस उपायुक्त परि. 1 अम., शिवाजी बचाटे, सहा. पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा अम. यांच्या मार्गदर्शनात क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पो.उप नि. गजानन राजमल्लु, स.फौ. विनय मोहोड, पो.हे.का. सुनिल लासुरकर, ना.पो.शि. जहीर शेख, अतुल संभे, पो.शि. राहुल हेंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!