
खोलापुरी गेट पोलिस स्टेशन हद्दीतील खुनाचा प्रयत्न करणारा पाहीजे असलेला आरोपी पोलिस आयुक्तांचे पथकाचे ताब्यात….
पोलिस आयुक्तांच्या सि.आय.यु. पथकाने पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे झालेल्या हल्यातील फरार आरोपीस शिताफिने केली अटक….
अमरावती – सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 09/12/2023 रोजी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती येथे फिर्यादी शुभम अशोकराव
ढोले वय 28 वर्ष रा. हनुमान नगर अमरावती यांनी पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे येवुन तक्रार दिली की, ते व त्यांचा भाऊ सुशिल ढोले हे घराजवळ असतांना काही अनोळखी इसम मोटारसायकलने आले व त्यांनी फिर्यादीस व त्यांच्या भावास शिवीगाळ करुन निघुन गेले नंतर फिर्यादी त्यांचा भाऊ तसेच त्यांचा मित्र असे दगडी पुलावरुन भाजी बाजारकडे जात असतांना त्या मुलांनी पुन्हा फिर्यादीस व त्यांच्या भावास शिवीगाळ केली व त्यातीलच एक विरु वानखडे याने त्याच्या जवळील चायना चाकु काढुन सुशिल ढोले याच्या डाव्या पसलीमध्ये मारुन गंभीर जखमी केले. इतर
इसमांनी सुद्धा त्यांच्या जवळीच चाकु काढले व सुशिल ढोले यास मारण्याच्या तयारीत असतांना फिर्यादी व त्यांचा मित्र यांनी त्यांना पकडल्याने ते सर्व तेथुन पळुन गेले. यानुसार फिर्यादीच्या तोंडी तक्रारीवरुन पोलिस स्टेशन खोलापुरी गेट येथे कलम 307, 147, 148, 149,504 भा.द.वि. चा गुन्हा दाखल तपास सुरु होता


अवैध धंद्यांच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तांचे पथक शहर हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हे खोलापुरी गेट परीसरातील गडगडेश्वर परीसरात लपुन असल्याची खात्रीशीर माहीती प्राप्त झाल्याने अत्यंत शिताफीने नमुद गुन्ह्यातील फरार आरोपी

1) विरेन्द्र उर्फ विरु पवन वानखडे वय 18 वर्ष रा. खरकाडीपुरा अमरावती
तसेच दोन विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा जुन्या वादातुन केल्याबाबत सांगीतल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती यांच्या ताब्यात देण्यात आले

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,सागर पाटील पोलीस उपायुक्त अमरावती शहर, शिवाजी बचाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त यांचे मार्गदर्शनात सि.आय.यु. पथकातील स.पो.नि. महेन्द्र इंगळे, पो.उप नि. गजानन राजमल्लु, तसेच स.फौ. विनय मोहोड, पोहवा सुनिल लासुरकर, नापोशि जहीर शेख, अतुल संभे,पोशि राहुल ढेंगेकार,विनोद काटकर यांनी केली.
.


