
अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अवैधरित्या गांजाची वाहतुक करणारा गुन्हे शाखेच्या ताब्यात,आरोपीसह ४ किलो गांजा केला जप्त…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 04/04/24 रोजी पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदाराकडून बातमी मीळाली की एक ईसम गांजासद्रुष्य वस्तुची वाहतुक करणार आहे यावरुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे गुन्हे शाखेच्या एटीबी पथकाने अमरावती चांदुर रेल्वे रोडवर असलेल्या वाघामाता मंदीराजवळ सापळा लावुन एक ईसम मोटारसायकल ने येताना दिसला


त्यास थांबवुन त्याचे नाव विचारले असता त्याचे नाव सुरेश नथ्थुजी जावतकर वय ६४ वर्ष रा. अंजनसींगी जि.अमरावती असे सांगितले वरुन त्याची तपासनी केली असता त्याचे ताब्यात गांजा नावाचा अंमली पदार्थ असलेली पिशवी जवळ बाळगून विक्रीकरीता अमरावती शहरात जात असल्याचे दिसुन आले. त्यावरुन त्याचे ताब्यातुन ३.९७० कि.ग्रॅ. गांजा तसेच मोबाईल आणि वाहतुकीकरीता वापरलेली मोटर सायकल असा १,००,५००/- ₹ चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यामुळे आरोपीविरुद्ध पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे कलम २०, २२ एनडीपीएस कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपासकामी अटक करण्यात आली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त,मुख्यालय कल्पना बारवकर यांचे आदेशाने सहा पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे,वरीष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा राहुल आठवले यांचेमागर्दशर्नाखाली सपोनि योगेश इंगळे, सफौ अजय गाडेकर, सुधीर सोनपरोते, विजय पेठे, अमर बघेल, सैयद इमरान अली, सुधीर गुडधे, अजय मिश्रा, संदीप खंडारे यांनी केली.



