
अमरावती शहर पोलिसांनी मुंडके धडावेगळे केलेल्या खुनाचा २४ तासाचे आत लावला छडा…
निर्घुणपणे खुन करुन म्रुतकाचे मुंडके छाटुन त्याची विल्हेवाट लावणार्यास अमरावती शहर गुन्हे शाखेने काही तासाचे आत केले जेरबंद,पैशाच्या देवानघेवानीच्या वादातुन खुन केल्याचे स्पष्ट…


अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि 28 नोव्हेंबर 2024 रोजी खोलापुरी गेट हद्दीत स्मृति विहार कॉलनी जवळ यादव यांचे शेताच्या तार कंपाउंड जवळ अकोली अमरावती येथे एक अज्ञात 60 ते 65 वयोगटातील पुरुषाचे मुंडके कापुन धडा वेगळे करुन क्रुरपणे धारदार शस्त्राचा वापर करुन हत्या करण्यात आली होती व मृतकाचे मुंडके सदर ठिकानी मिळुन आले नव्हते मृतकाचे वर्णन पाहता अंगात पांढरा रंगाचा पायजामा व पिवळ्या रंगाचा कुर्ता व ग्रे रंगाचे स्वेटर व चैंपीयन कंपनीची निळ्या रंगाची ट्रक परीधान केलेल्या अवस्थेत होता. मृतकाच्या बाजूस तुटलेला चष्मा व कथिया रंगाची चप्पल आढबुन आली. तसेच पायजामा मधे सुर्यछाप मस्कापुरी तंबाखुची पुडी व चुन्याची डब्बी मिळून आली. सदर बाबतीत खोलापुरी गेट पोलिस स्टेशुन येथे गुन्हा रजिस्टर क्र. 269/2024 कलम 103(1), 238 BNS अन्वये दाखल करण्यात आला असुन याचा तपास पोलिस निरीक्षक गौतम पातारे करीत होते

सदर खुनप्रकरणात एकंदरीत परिस्थिती पाहता मृतका बाबत काहीही माहीती मिळू न शकल्याने सदर मृतक कोण आहे या बाबत पोलिस यंत्रणा ही अहोरात्र प्रयत्न करीत होती. सदर गुन्हाचा सखोल समांतर तपास करीत असतांना पोलिस निरीक्षक गौतम पातारे यांना माहीती मिळाली की, प्रसिध्द केलेल्या शोध पत्रिकेनुसार मयताचे नातेवाईक ओळख पटविण्यासाठी ईर्विन हॉस्पीटल अमरावती येथे दाखल झाले आहेत. तसेच पोलिस निरीक्षक आसाराम चौरमोले व पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव गुन्हेशाखा युनीट १ यांना माहीती प्राप्त झाली की सदर म्रुतकाबाबत सरमसपुरा पोलिस स्टेशन अमरावती ग्रामीण येथे बेपत्ता असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. प्राप्त तक्रारीच्या अनुशंगाने व नातेवाईंकांकडुन प्राप्त झालेल्या माहीती नुसार म्रुतक ईसम दुर्याधन बाजीराव कडु वय 65 वर्ष धंदा-सावकारी रा. भुगांव ता. अचलपुर असल्याची खात्री झाली तसेच तपासात असे निष्पन्न झाले की मृतक हा दिनांक 28/11/2024 रोजी 10/30 वा चे सुमारास त्यांचे गावातील व त्यांचेच नातेवाईक असलेल्या निकेतन रामेश्वर कडु वय 29 वर्ष धंदा नोकरी (इंडीयन आर्मित 203 आर्टिलरी अंबाला) येथे नोकरीस असलेला व (सुट्टी वरुन गैरहजर असलेला) याचे सोबत दिसला होता.

मृतकाने निकेतन यास दोन लाख सत्तर हजार रुपये (2,70,000) रुपये व्याजाने दिले होते. व मुद्दल व व्याज याच्या देण्यावरुन दोघांमधे वाद निर्माण झाला होता मयताने वांरवार व्याज व मुद्दल देणे बाबत निकेतन याचे कडे तगादा लावला होता. परंतु निकेतन याचे म्हणण्यानुसार त्याने सर्व मुद्दल व व्याज मृतकास परत करुन सुद्धा जास्तीचे व्याज व मुद्दल परत करणे बाबत वांरवार घरी येवुन तसेच त्याचेशी संपर्क साधुन तगादा लावला होता वरील मुद्यावरुन अधिक तपास केला असता सदरचा होणा-या त्रासाला कंटाळुन निकेतन याने मृतकाचा बदला घेण्यासाठी अमरावती येथे पैसे देतो असा बहाना करुन दिनांक 28/11/2024 रोजी 10/30 वा सुमारास त्याचे स्वताचे मोटारसायकल वरुन भुगाव वरुन अमरावती येथे घेवुन आले व अकोली येथील यादव यांचे शेताचे कुंपना जवळ मृतक यांना लघवी करायची असल्याने तेथे घेवुन गेल्यानंतर व मृतक हे लघवी करण्यासाठी उभे राहीले असतांना त्यांना पाठिमागुन पकडुन त्याचे हातातील धारदार चॉपरने निर्दयीपणे मुंडके कापुन त्यांची हत्या केली. हत्या केल्या नंतर त्यांचे मुंडके त्याचे बँगमचे टाकुन आसेगांव ता. चांदुर बाजार येथील नाल्यात फेकुन दिले. असे तपासात निष्पन्न झाले.
सदर प्रकरणात अधिक तपास केला असता निकेतन रामेश्वर कडु याने दुर्याधन बाजीराव क वय 65 वर्ष धंदा-सावकारी रा. भुगांव ता. अचलपुर याची हत्या केल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस निरीक्षक आसाराम चोरमोले व गुन्हेशाखा युनीट १ चे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव तसेच खोलापुरी गेट पोलिस स्टेशनचे गौतम पातारे यांचे पथकाने स्थानिक पोलिस स्टेशनचे सपोनि निलेश गोपालचावडीकर (सरमसपुरा पो.स्टे.) व त्यांचे पथकाचे मदतीने यातील मुख्य आरोपी निकेतन रामेश्वर कडु याचा शोध घेवुन त्याला ताब्यात घेण्यात आले. त्यास गुन्हात दिनांक 29/11/2024 रोजी अटक केल्या नंतर त्याचे कडुन दोन पंचासमक्ष मृतकाचे मुंडके व ज्या बॅग मधे मुंडके घेवुन गेला ती बॅग व त्याच बरोबर गुन्ह्यात वापरलेले कपडे व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.सदरचा गुन्हा हा प्रथम दर्शनी एकदम गुंतागुंतीचा व क्लीष्ट व मृतकाची ओळख न पटल्यामुळे पोलिसांसमोर एक मोठे आव्हान उभे राहीले होते त्याचा तपास अतिशय चोखपणे करुन गुन्हा उघडकिस आणला
सदरची उल्लेखनिय कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंदजी रेड्डी पोलिस उपायुक्त(परीमंडळ २) गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारावकर, सहा पोलिस आयुक्त(राजापेठ विभाग)जयदत्त भवर यांचे केलेल्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गौतम पातारे, पोउपनि चौधरी,सफौ खैरकर,पोलिस अंमलदार राम लोखंडे,प्रदीप राजुरकर, अमोलनकाशे, इरफान, मंगेश भेलाय, राजेश मोहोड,अमोल पोकळे, संतोष सरोदे (चालक), प्रविण परखडे (चालक)तसेच पोलिस निरीक्षक आसाराम चोरमोले, मंगेश लोखंडे, इशा खांडे, छोटेलाल यादव, निवृत्ती काकड, रणजीत गावंडे, अमोल मनोहरे, आशीष धवळे, सागर गाडे, गजानन सातंगे (चालक) सचिन भांबे (समरसपुरा पो.स्टे.)गुन्हे शाखा युनीट १ चे पोलिस निरीक्षक गोरखनाथ. जाधव,सपोनि मनिष वाकोडे, सपोनि मनीष इंगोले, फिरोज खान, सतीश देशमुख, नाझीमोद्दीन सय्यद, विकास गुडघे, सुरज चव्हाण, चालक निखील, रोशन माहुरे, किशोर खंगेरे सर्व युनिट 1 तसेच सायबर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, सपोनि अनिकेत कासार, पोहवा निखील, अनिकेत वानखडे, यांनी अहोरात्र परिश्रम करुन आरोपीस 24 तासाचे आत निष्पन्न करुन व अटक करुन गुन्हा उघडकीस आणण्यास महत्वाची कामगीरी बजावली आहे.


