राजापेठ येथे नोंद असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गुन्हे शाखा युनीट २ ने २४ तासाचे आत केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडी च्या गुन्हयातील फरार आरोपीस गुन्हेशाखा युनिट – २ ने २४ तासाचे आत केले जेरबंद….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि २१ एप्रिल २०२५ रोजी उदय कॉलनी, साई नगर येथे राहणारे अशोक रामचंद्र मुंडवाईक यांनी पो. स्टे. राजापेठ येथे तक्रार दिली की, दिनांक २१/०४/२०२५ रोजी दुपारी अंदाजे ०४.३० वा.ते व त्यांची पत्नी नातेवाईकाकडे गेले व त्याच दिवशी रात्री ०७.३० वा. घरी परत आले व लोखंडी गेटचे लॉक उघडुन आत गेले असता घराचा मुख्य लाकडी दरवाजाला असलेला कुलुप कोंडा तुटलेला दिसला व घरातील लाईट सुरू दिसले त्यांना शंका आली म्हणुन त्यांनी आत जावुन बघितले असता घरातील किचनला लागुन असलेल्या दोन्ही बेडरूम मधील सामान कपडे खाली पडलेले दिसले दोन्ही बेडरूम मधील लोखंडी आलमारी उघड्या दिसल्या व लॉकर मधिल जुने वापरते दागिने १८ ग्रॅम सोने कि १,०३,०००/- नगदी ५५०००/- असा एकुण १,५८,०००/- चा माल चोरून नेला. अशा फिर्यादी अशोक रामचंद्र मुंडवाईक यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. राजापेठ येथे अप.क. १६० / २०२५ कलम ३३१(३), ३०५ (अ) भा. न्या.सं. प्रमाणे गुन्हा नोंद  करण्यात आला





दिवसाढवळ्या घडलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस आयुक्त, नविनचंद्र रेडडी यांनी आदेशाने सदर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे नेत्रुत्वात सुरु करण्यात आला त्यानुसार दि २१/०४/२०२५ रोजी गुप्त बातमीदाराच्या माहिती वरून गुन्हयातील एका विधीसंघर्षीत बालकास निष्पन्न करुन सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेवुन त्याचे कडुन गुन्हयात वापरलेली मोटारसायकल ताब्यात घेण्यात आली होती. सदर गुन्हयात आशिष उर्फ छोटा जंगली सांबसिंग सागर रा. विलास नगर अमरावती हा आरोपी फरार होता.त्यास आज दि. २४/०४/२०२५ रोजी युनिट २ चे पथकाने गुप्त बातमीच्या आधारे आशिष उर्फ छोटा जंगली सांबसिंग सागर रा. विलास नगर अमरावती यास मोठया शिताफीने सापळा रचुन ताब्यात घेतले व पुढील तपास कामी पो.स्टे राजापेठ यांचे ताब्यात देण्यात आले आहे. नमुद आरोपी हा घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार आहे.



सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शिवाजी बचाटे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार साहेब, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोहवा गजानन ढेवले, दिपक सुंदरकर, मनोज ठोसर, आस्तिक देशमुख, नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, पोकॉ चेतन कराडे, योगेश पवार, विशाल वाकपांजर, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, चालक पोहवा संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!