अमरावती गुन्हे शाखेने सोनाराला लुटणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद….
अमरावती गुन्हे शाखेने सोनाराला लुटणारी आंतरराज्यीय टोळी केली जेरबंद,२.५ लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत,अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता….
अमरावती (शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, यातील फिर्यादी अरविंद उत्तमराव जावरे हे त्याचे वडीलांसह दुचाकी वाहनाने त्यांचे नावरे ज्वेलर्स नावाचे दूकानात दुकान उघडण्यासाठी सकाळी ११.३० वा.च्या दरम्यान मातामाय मंदीर वंसुधरा कॉलनी येथून जात असताना त्याचे दुचाकी समोर एक इसम आला व त्यानी त्याचे दूचाकीला लाथ मारली त्यात त्याचा तोल जाऊन खाली पडले त्या दरम्यान त्याचे इतर साथीदारांनी त्याला व त्याचे वडीलांना मारहाण करून तसेच बंदूक दाखवून त्याचे हातातील चांदीचे भांडे ज्यामध्ये चांदीचे करंडे, पायल, नोडवे असा एकंदरीत २५ किलो चांदीचे भांडे असणारा मुद्देमाल ज्याचे मुल्य २० लाख रू. असणारी बॅग शस्त्राचा धाक दाखवून आठ इसमांनी लुटून नेल्याबाबत तक्रार दिली यावरुन पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे अपराध कं. ७३४/२०२४ कलम ३११ बि.एन. एस सहकलम ३/२५ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वरिल गुन्हा हा गंभीर असल्याने पोलिस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी लागलीच घटनास्थळाला भेट देऊन योग्य त्या सूचना देऊन गुन्हा उघड करण्याबाबत आदेशीत केले होते.पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी लागलीच गुन्हा संदर्भाने आयुक्तालय कार्यालयात बैठक घेवून बेठकीला आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकारी, गुन्हे शाखा व सि.आयु. पथक चे अधिकारी अंमलदार, तसेच सर्व पोलिस स्टेशन च्या डि.बी स्टाफ ला बोलावून गुन्हा उघड करण्यासंदर्भात मार्गदर्शन व नियोजन करून आयुक्तालय स्तरावर आठ टिम तयार करण्यास सांगितल्या. व त्यांना तपासासंबंधाने रवाना केले. सर्व टिम हि गुन्हा घडल्यापासून गुन्हासंदर्भाने प्रत्येक गोष्टीवर बारकाईने सातत्याने तपास करत होती.
गुन्हे शाखा युनिट ०१ हि घटना घडल्यापासून निंरतर सातत्याने गुन्हा व आरोपीबाबत तसेच आरोपीतांनी गुन्ह्यात वापरलेल्या गाडीबाबत माहीती काढत असताना आरोपी हे नागपूर च्या दिशेने गेल्याचे गोपनीय बातमीदार व तांत्रिक माहीतीवरून दिसून आल्याने मागील चार दिवसांपासून नागपूर येथील गोधनी भागात सापळा रचून बसले असता (दि.०९सप्टेंबर) रोजी गोंथनी भागात गुन्ह्यातील आरोपीचे शरीरयष्ठी सारखा दिसणारा इसम दिसून आल्याने त्याला लागलीच ताब्यात घेवून त्याला त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव १) गयासुददीन वहाजुददीन (कुरेशी) वय ४२ वर्ष, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर, मूळ पत्ता गाव- रामपूर पोलीस स्टेशन मानधाना, जिल्हा- प्रतापगड, उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम मातानगर, प्रविन बोराटे यांचे इथे किरायाने गोधनी, पो. स्टे मानकापूर नागपूर असे सांगीतले.
त्याला गुन्ह्यासंदर्भाने बारकाईने विचारपूस केली असता अमरावती येथे सोनाराला लूटल्याबाबत त्याने कबूल केले असून त्याचे इतर साथीदार हे उत्तर प्रदेशचे असल्याचे सांगीतले तसेच गुन्ह्यातील मुद्देमालाबाबत विचारणा केली असता सदर मुद्देमाल विक्रीसाठी त्याने त्याचा ओळखीचा इसम साजीद याचे कडे दिल्याचे सांगीतल्याने साजीद याचा शोध घेतला असता तो नागपूर येथील मानकापूर भागात मिळून आल्याने त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव २) मोहमद साजीक खॉन मोहमद हारून (वय ३७ वर्ष), व्यवसाय- फेब्रीकेशन, मूळ राहणार हिरापूर पो. स्टे भरवेली जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश हल्ली मु संतोष ठाकूर यांचे इथे किरायाणे मा बम्लेश्वरी नगर मानकापूर नागपूर असे सांगीतले
त्याच्याकडे मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्याने माल घेतल्याचे कबूल केले असून त्याचे कडून पांढ-या धातूचे भांडे ज्यामध्ये करंडे, पायल, जोडवे व इतर साहीत्य असा अंदाजे वजन ३किलो अंदाजे मुल्य २,५०,०००/- रू. मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आला आहे. तसेच गुन्हा करण्यासाठी बोलेरा व अपाची गाडीचा वापर केला असून सदर गाडया पहिल्या आरोपीने सावरमेंढा जिल्हा बैतूल व वरूड जिल्हा अमरावती येथून चोरल्याचे सांगीतले आहे. तसेच त्याचे कडे अजून बारकाईने तपास केला असता त्याने नागपूर व भंडारा येथून सुद्धा दुचाकी चोरल्याचे सांगीतल्याने त्याबाबत माहीती घेतली असता सदर आरोपीकडून पोलीस स्टेशन भैसदही, पोलीस स्टेशन वरूड जिल्हा, पोलीस स्टेशन तुमसर जिल्हा, पोलीस स्टेशन बोरी जिल्हा, हे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर गुन्ह्यात १) गयासुददीन वहाजुददीन (कुरेशी) वय ४२ वर्ष, व्यवसाय ट्रक ड्रायव्हर मूळ पत्ता गाव- रामपूर पोलीस स्टेशन मानधाना जिल्हा- प्रतापगड, उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम मातानगर, प्रविण बोराटे यांचे इथे किरायाने गोधनी, पो.स्टे मानकापूर नागपूर, २) मोहमद साजीक खॉन मोहमद हारून (वय ३७ वर्ष) व्यवसाय फेब्रीकेशन मूळ रा.हिरापूर पो.स्टे भरवेली जिल्हा बालाघाट मध्यप्रदेश हल्ली मुकाम संतोष ठाकूर यांचे इथे किरायाने मॉ बम्लेश्वरी नगर मानकापूर नागपूर असे सांगीतले.
या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या कडून पांढ-या थातूचे भांडे ज्यामध्ये कंरडे, पायल, जोडवे व इतर साहीत्य असा अंदाजे वजन ३किलो अंदाजे मुल्य २,५०,०००/- रू मुद्देमाल हा ताब्यात घेण्यात आला आहे. इतर आरोपीचे शोध कामी तिन पथके रवाना करण्यात आले आहेत. या मधील पहिला आरोपी हा फोर व्हिलर चोरीचा सराईत गुन्हेगार असून इतर आरोपी हे कुख्यात असून रेकॉर्डवर असण्याची दाट शक्यता आहे त्यांचे कडून महाराष्ट्र राज्यात इतर हि गंभीर गुन्हे केल्याची शक्यता असून त्या दृष्टीकोणातून तपास सुरू आहे.सदर गुन्ह्यातील आरोपी पुढील तपासासंबंधाने पोलीस स्टेशन गाडगेनगर यांचेकडे देण्यात आला आहे. सदर गुन्हाचा पुढील तपास गाडगेनगर पोलीस करत आहे.
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त कल्पना बारवकर (मुख्यालय), पोलिस उपआयुक्त गणेश शिंदे, परिमंडळ०२, पोलिस उपआयुक्त सागर पाटील, परिमंडळ ०१, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त अरून पाटील, गाडगे नगर विभाग यांचे मार्गदर्शना खाली युनिट ०१ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, फिरोज खॉन, सतिश देशमूख, अलीमउददीन खतीब नाईक पोलीस अमंलदार नाझिमउददीन सयैद, विकास गुडदे, पोलीस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, चालक रोशन माहुरे, किशोर खेंगरे तसेच पोलीस स्टेशन सायबरचे पोलीस निरिक्षक पुनीत कुलट, सहायक पोलीस निरिक्षक अनिकेत कासार, नाईक पोलीस अमलदार पंकज गाडे यानी केलेली आहे.