अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट १ ने गांजासह दोघांना घेतले ताब्यात,२६ किलो गांजा जप्त….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहर गुन्हेशाखा युनिट १ ची धडाकेबाज कार्यवााही, अवैध्यरित्या गांजाची विक्री करणा-या इसमांस ताब्यात घेऊन २६ किलो गांजा केला जप्त….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे दिनांक ०६ डिसेंबर २०२४ रोजी पोलिस स्टेशन गाडगेनगर हददीमध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली की, शेखर गडलींग नावाचा इसम हा त्याचे साथीदारासह पंचवटी चौकात डॅा पंजाबराव देशमूख हॉस्पीटल जवळ गांजा बाळगून विक्रीसाठी येत आहे.





सदर माहीती खात्रीशीर असल्याने  पंचवटी चौक डॅा  पंजाबराव देशमूख हॉस्पीटल जवळ सापळा रचला असता माहीती प्रमाणे दोन इसम आपल्या हातात दोन मोठया बॅग घेवून येत आहेत. त्यांना स्टाफच्या मदतीने घेराव टाकून थांबवीले व त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव १) शेखर संजय गडलींग वय २७, वर्ष रा. निळकंठ शाळेजवळ, महाजनपुरा अमरावती, २) सुनिल सुधाकर वानखडे, वय ३९ वर्ष रा. अडगाव, ता. मोर्शी, जि. अमरावती असे सांगीतले.



त्यांचे ताब्यातुन २६.१४५ कि.ग्रॅ. गांजा व इतर साहित्य असा एकुण किंमत ५,३२,९०० रूपये चा मुद्देमाल मिळुन आल्याने ते जप्त करून नमुद आरोपीतांविरूध्द पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे अपराध क्रमांक १०३२/२०२४ कलम २०,२२, २९ एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले



सदरची कारवाई  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त  कल्पना बारावकर,पोलिस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा, शिवाजी बचाटे, सहायक पोलिस आयुक्त अरूण पाटील, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव यांचे नेतृत्वाखाली सपोनि मनिष वाकोडे, सपोनि योगेश इंगळे, सपोनि अनिकेत कासार,पोहवा फिरोज खान, सतिश देशमूख, अजय मिश्रा, पोलीस अंमलदार नाझीमोददीन सैयद, विकास गुडधे, संग्राम भोजने, सुरज चव्हाण, निखील गेडाम, योगेश पवार, उमेश बानुबाकोडे, किशोर खेंगरे, रोशन माहुरे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!