सचिन बार येथे दरोडा टाकणारे रेकॅार्डवरील गुन्हेगार फ्रेजरपुरा पोलिसांचे ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सचिन बार येथील दरोडयाचे गुन्हयातील एकुण ६ रीकॉर्डवरील आरोपी जेरंबद,फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन अमरावती शहर यांची कामगीरी…,
अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दि. १५/१२/२०२३ रोजी सायंकाळी ०६/०० वाजेपासुन ते ०९/०० वा चे दरम्याव रेकॅार्डवरील गुन्हेगार  शेख सुफियान, अनिकेत वरगट, यश गडलींग, राहुल श्रीरामे, गोटया उर्फ प्रथमेश इंगोले व त्यांचे इतर साथीदार यांनी सचिन बार, अमरावती मध्ये प्रवेश करून दारू कमी पैशात मागण्याचे कारणावरून फिर्यादी, त्यांचा भाऊ नितीन, व वेटर निखील फुलके यास चाकुने व लाथा बुक्याने मारून त्यांचे खिशातील १७०० रू काढुन घेतले व बारचे दरवाज्यावर दगडफेक करून दरवाज्याचे काच फोडुन नुकसान केल्याने फ्रेजरपुरा पोलिस स्टेशन येथे अप. क्र १०५९/२०२३ भा.दं.वि कलम ३९५, ३९७, ४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हयाचा तपास करीत असतांना आरोपीबाबत गोपणीय माहीती काढली असता आरोपी हे रीकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याने त्यांनी पोलिसांनी त्यांना अटक करू नये म्हणुन योग्य ती खबरदारी घेतली होती. तरी पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत गुन्हयातील प्रमुख आरोपी नामे

१) सम्राट रविंद्र फुले, वय १९ वर्षे, व्यवसाय शिक्षण, रा. विश्वशांती बुदध विहारा जवळ वडाळी अमरावती





२) प्रथम उर्फ गोटया रविंद्र इंगोले, वय २० वर्षे, रा. भातकुली पंचायत समिती क्वार्टर नं ७, अमरावती



३) यश प्रविण गडलींग वय २१ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. संजय गांधीनगर, अमरावती



४) शेख सुफियान शेख इलीयास वय १९ वर्षे, व्यवसाय मजुरी रा. गजानन नगर अमरावती

५) अनिकेत उर्फ सोनु देवानंद वरघट, वय २१ वर्षे, व्यवसाय मजुरी, रा. गजानन नगर, अमरावती
६) राहुल गौतम श्रीरामे, वय २१ वर्षे, व्यवसाय शिक्षण, व्यवसाय मजुरी रा. गजानन नगर, नविन बायपास अमरावती

यांना अटक करण्यात आली असुन आरोपी क्र १ व २ न्यायालयीन कोठडीत असुन आरोपी क्र ३ ते ६ हे पोलिस कोठडीत आहेत व तपास चालु आहे. अटक आरोपीकडुन त्यांचे इतर साथीदाराची माहीती घेऊन पुढील कार्यवाही सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त मुख्यालय तथा परिमंडळ १  सागर पाटील,सहा पोलिस आयुक्त फ्रेजरपुरा विभाग, श्रीमती पुनम पाटील , यांचे मार्गदर्शनाखाली फ्रेजरपुरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गोरखनाथ जाधव, पोलिस निरीक्षक हनुमंत डोपेवाड पोलिस निरीक्षक निशांत देशमुख तपासी अधिकारी सहा. पोलिस निरीक्षक रविंद्र सहारे, मपोउपनि ज्योती देवकते, पोहवा सुनिल सोळंखे,  रज्जाक शेखुवाले, नापोशि
शशिकांत गवई, पोशि सागर पंडीत, शेखर गायकवाड यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!