घरफोडीतील अट्टल आरोपी राजापेठ पोलिसांचे ताब्यात,५ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

राजापेठ(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर वुत्त असे की  शहरामध्ये वाढत्या चोरी, घरफोडीच्या घटना पाहाता सदर घटनांना आळा बसावा या करीता पोलिस आयुक्त  यांनी मार्गदर्शन करुन कार्यवाही करण्याच्या सुचना निर्गमीत  केल्या होत्या.त्यानुसार पोलिस स्टेशन राजापेठ येथे दाखल अप. क्र. ९८५/२०२३ कलम ४५७ ,३८०, ५११, ३४ भादवि च्या गुन्ह्यातील आरोपी

१) शंकर सुभाष बंन्सोड वय ४२ वर्ष रा. भिमनगर अमरावती.





२) परमेश्वर अशोक सुखदेवे वय १९ वर्ष रा. केडीया नगर अमरावती



३) पंकज राजु गोंडाने वय २७ वर्ष रा. चवरे नगर अमरावती शहर



हे घरफोडी करणारे अट्टल  गुन्हेगार यांना अटक करुन कौशल्य पुर्ण विचारपुस करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचे तपासात या आरोपीकडुन पोलिस स्टेशन ,राजापेठ,नांदगाव पेठ,बडनेरा या अभिलेखावरील तसेच आयुक्तालय अभिलेखावर एकुन ५ गुन्हे
सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीकडुन पोलिस कोठडी दरम्यान उघड करण्यात आले तसेच एकुन ३,८३,५९० /- रु. तसेच गुन्हा करण्याकरीता वापरण्यात आलेला एक लोखंडी रॉड, पेचकच, पेन्चीस असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्यात आरोपी पंकज राजु गोंडाने वय २७ वर्ष रा. चवरे नगर अमरावती हा दि. ११/१०/२०२३ रोजी नागपुर जेल मधुन सुटला तेव्हापासुन तो सतत अमरावती शहर, अमरावती ग्रामिण, नागपुर हद्दीत चोरी घरफोचे गुन्हे करत आहे. सदर आरोपी हा पोलिस कोठडी मध्ये असुन तपास सुरु आहे त्यामुळे आणखी १० ते १५ अधिक गुन्हे उघडकीस येवुन मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे.

सदर कार्यवाही ही नविनचंद्र रेड्डी पोलिस आयुक्त अमरावती शहर, सागर पाटील पोलिस उपायुक्त परीमंडळ क्रमांक ०२ अमरावती शहर तसेच  शिवाजी बचाटे ,प्रभारी कैलास पुंडकर सहाय्यक पोलिस आयुक्त राजापेठ विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन राजापेठ च्या  वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीमती सिमा दाताळकर यांचे नेतृत्वात पोउपनि गजानन काठेवाडे, गंगाधर जाधव, छोटेलाल यादव, सागर सरदार निलेश गुल्हाने, दिनेश भिसे, प्रशांत गिरडे, नरेश मोहरील, शेख वकील, बिट मार्शल चे विवेक, बिट मार्शल चे निलेश मनिष करपे, गनराज राउत, पंकज खटे, पांडुरंग बुधवंत, निलेश पोकळे, राजु पुराम यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!