
खुनातील फरार आरोपीस पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाने शिताफिने शस्त्रासह घेतले ताब्यात….
राजापेठ पोलिस स्टेशन हद्दीतील खुनामधील फरार आरोपीस सि.आय.यु.पथकाने केले जेरबंद….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि. 15 एप्रिल 2025 रोजी पोलिस स्टेशन राजापेठ हद्दीत जुन्या वैमनश्यावरुन तिन इसमांनी तिर्थ गजानन वानखडे याच्यावर घातक शस्त्रांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीररीत्या जखमी केले होते व उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला. अश्या या वरुन पोलिस स्टेशन राजापेठ येथे खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता


सदर गुन्ह्याच्या तपासात गुन्ह्यातील आरोपी हे घटनास्थळावरुन फरार झाल्याने त्यांचा त्यांचे राहते घरी तसेच इतरत्र शोध घेण्यात आला परंतु ते मिळुन आले नाही.पोलिस आयुक्तांचे आदेशाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध पोलिस स्चेशन राजापेठ व पोलिस आयुक्तांचे विशेष सी.आय.यु. पथक करीत असतांना वरुन नमुद आरोपी बाबत गोपनिय माहीती प्राप्त झाली की, गुन्ह्यातील तिन्ही आरोपी हे खंडेलवाल नगर अमरावती जंगल परीसरात लपलेले आहे.

अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन ताबडतोब खंडेलवाल नगर परीसरात नमुद आरोपींचा शोध घेतला असता ते तिन्ही आरोपी 1) सुरज वसंतराव बघेकर वय 36 वर्ष रा. अंबा विहार अमरावती 2) चेतन विनोद पिंजरकर वय 36 वर्ष रा. पटविपुरा अमरावती 3) रोशन विनोद पिंजरकर वय 40 वर्ष रा. पटविपुरा अमरावती यांना शस्त्रासह खंडेलवाल नगर परीसरातुन ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा हा जुन्या वादातुन केला असल्याचे सांगुन सदर गुन्ह्याची कबुली दिली.यावरुन त्यांना सदर गुन्ह्यात ताब्यात अटक केली असुन पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त(परीमंडळ २) गणेश शिंदे, सहा. पोलिस आयुक्त जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात पोलिस आयुक्तांचे विशेष पथक(क्रिमीनल इंन्टेलीजन्स युनिट) मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, स. फौ. विनय मोहोड , पो.हे.का. सुनिल लासुरकर, जहीर शेख, ना.पो.शि. अतुल संभे, पो.शि. राहुल देंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.


