चालते मालवाहु वाहन थाबंवुन मारहान करणारे ६ तासाचे आत घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

चालत्या वाहनास थांबवुन मारहान करुन दरोडा टाकणारे ६ तासाचे आत २ आरोपीस केले जेरबंद,स्थागुशा व पोलिस स्टेशन कु-हा येथील पथकाची संयुक्तिक कार्यवाही….

कु-हा(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक ३/२/२४ रोजी नवनियुक्त ठाणेदार सहाय्यक पोलिस निरीक्षक अनुप वाकडे हे पोलिस स्टेशनला हजर असतांना फिर्यादी  प्रमोद पांडुरंगजी भोयर, वय ४२ वर्षे, रा. इंदीरानगर, चांदुर रेल्वे यांनी येवुन तक्रार दिली की, शनिवार दि.०३/०२/२०२४ रोजी ते त्यांचे आयशर ट्रक क्रं.एम.एच.२७/बी.एक्स. ९५६० ने आर्वी, जि. वर्धा येथुन ढेप विकत घेवुन आपले वाहनाने आर्वी ते चांदुर रेल्वे कडे येत असतांना सायंकाळी ०७.०० वा ते ०७.३० वा. दरम्यान
कौडण्यपुर जवळ त्याचे वाहनाचे मागील बाजुने दोन दुचाकीवर ३-४  अनोळखी इसम आले व त्यांनी त्यांचे जवळ येऊन शिविगाळ करून त्यांना वाहन थांबविण्यास सांगीतले, परंतु फिर्यादीने वाहन न थांबवीता  तसेच पुढे गेले असता नमुद अनोळखी इसमांपैकी एकाने त्याची दुचाकी पुढे नेवुन फिर्यादीचे ट्रक समोर आडवी उभी केली त्यामुळे फिर्यादीस आपले वाहन थांबवावे लागले. त्यावेळी दोन दुचाकी वरून आलेल्या अनोळखी ईसमांनी फिर्यादीचे ट्रकचे कॅबीनमध्ये प्रवेश करून त्यांना लाथा-बुक्यांनी व धारदार शस्त्राने मारहाण सुरू केली झटापटी दरम्यान त्यांचे हाताचे मनगटावर जखम झाली आहे. त्याचवेळी आरोपींनी फिर्यादीस पैश्याची मागणी करीत फिर्यादीचे पॅन्टचे खिश्यातुन नगदी ९२०००/- रू जबरीने हीसकावुन दुचाकीने पळुन गेले.





घडलेल्या घटनेचे अनुषंगाने पोलिस स्टेशन कु-हा येथे विविध कलमान्वये गुन्हा  नोंद करण्यात आला असुन, तपासाअंती अजुन कलमवाढ करण्यात येऊ शकते घटनचे गांभीर्य पाहता घटनास्थळी वरीष्ठ पोलिस अधिका-यांनी तात्काळ भेटी दिल्या व गुन्हा उघडकीस आणण्याच्या द्रुष्टीने पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक, पंकज कुमार कुमावत यांनी मार्गदर्शन करून पोलिस स्टेशन कु-हा व स्थानिक गुन्हे शाखा येथील एकुण ०४ पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकाने फिर्यादी हयाने आर्वी, जि. वर्धा येथील ज्या ठिकाणावरून ढेप विकत घेवून आपले वाहनात भरली होती, त्याठिकाणी तसेच मार्गावरील सर्व सी. सी. टी. व्ही फुटेजची पाहणी केली तसेच ढेप भरण्याचे काम करणारे मजुर हयांची सुध्दा कसुन विचारपुस केली असता आरोपी नामे



नितेश उध्दवराव पुरी, वय २५ वर्षे, रा. वर्धा मनेरी, ता. आर्वी, जि. वर्धा



याचेवर संशय निर्माण झाल्याने त्यास ताब्यात व विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करण्यात आली असता आरोपी सदर गुन्हया त्याचे ईतर साथीदार नामे

१) करण मुगबेलसिंग बावरी, वय २६ वर्षे,

२) सुरज पद्माकर थुल, वय २१ वर्षे,

३) गोपाल किसनराव दखणे, वय २३ वर्षे

४) विकास मुंद्रे

५) सुरज गडलींग

सर्व रा.आनंदवाडी,ता.तिवसा, जि. अमरावती यांचे मदतीने केला असल्याची कबुली दिली. आरोपी नामे १) नितेश उध्दवराव
पुरी,वय २५ वर्षे,रा.वर्धा मनेरी, ता. आर्वी, जि. वर्धा २) करण मुगबेलसिंग बावरी, वय २६ वर्षे, ३) सुरज पद्माकर थुल, वय
२१ वर्षे, ४) गोपाल किसनराव दखणे, वय २३ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे तसेच आरोपी ४) विकास मुंद्रे ५ )सुरज गडलींग हे फरार असुन त्यांचा कसुन शोध घेण्यात येत आहे. अटक आरोपीतांकडुन गुन्हयात वापरलेल्या दोन दुचाकी किं.१,१०,०००/- रु  माल जप्त करण्यात आला असुन पुढील तपास कु-हा पोलिस करित आहेत.

व्रुत्त लिहेपर्यंत अशी माहीती मिळतेय की आरोपींची पोलिस कोठडी घेणार असुन  बाकीचे २ आरोपीसुध्दा पथकाने ताब्यात घेतल्याचे कळते

सदरची कार्यवाही  विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा.  पंकजकुमार कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण.,संचिन्द्र शिंदे, उप विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात  किरण वानखडे, पोलिस निरीक्षक.स्था.गु.शा., अनुप वाकडे, ठाणेदार, पोलिस स्टेशन, कु-हा, स.पो.नि. सचिन पवार, पो. उप.नि. संजय शिंदे व पो.स्टे. कु-हा येथील पो. अमंलदार अनिल निघोट, हेमंत डहाके, सागर निमकर, दर्पण मोहोड यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!