अमरावती: ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत १० लाखांचा गांजा जप्त; २ तस्करांना अटक

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई: १० लाखांहून अधिक किमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक

अमरावती:

अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अवैध अंमली पदार्थांची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध धडक कारवाई करत १० लाख ४३ हजार ४५० रुपये किमतीचा २०.८६९ किलोग्राम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत एक पुरुष आणि एका महिलेला रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.



पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन कवच’ या संकल्पनेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

अमरावती ग्रामीणच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पोलीस स्टेशन लोणी टाकळी हद्दीत गस्त घालत असताना, त्यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, बडनेरा ते लोणी रोड लगत असलेल्या श्री संत सखाराम महाराज देवस्थान बोर्डाजवळ एक पुरुष व एक महिला अंमली पदार्थ घेऊन येणार आहेत.



प्राप्त माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने पंच, पोलीस स्टॉप, इलेक्ट्रॉनिक वजन मापारी आणि फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी सापळा रचला. तेथे संशयितरीत्या पांढऱ्या रंगाच्या मळकट नायलॉन गोणीसह उभे असलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आरोपींची नावे व जप्त केलेला माल

चौकशी दरम्यान आरोपींनी आपली नावे खालीलप्रमाणे सांगितली:



  1. सुधिर बुधाजी फुलमाळी (वय ३६ वर्षे, रा. आनंद नगर, वर्धा)

  2. कांता रणजीत लोंगबरसे (वय २८ वर्षे, रा. फुलफेल, वर्धा)



पंचांसमक्ष गोणीची पाहणी केली असता त्यात २०.८६९ किलोग्राम शुद्ध गांजा आढळला. या मुद्देमालाची एकूण किंमत १०,४३,४५० रुपये इतकी आहे. पोलिसांनी हा माल जप्त करून लोणी पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.

अंमली पदार्थांविरोधात ‘झिरो टॉलरन्स’

अमरावती ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थांच्या अवैध विक्री, वाहतूक आणि साठवणुकीविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स पॉलिसी’ (Zero Tolerance Policy) स्वीकारली आहे. अमरावती जिल्ह्यात अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशी धडक मोहीम पुढेही सुरूच राहील, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक

ही कारवाई अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलीस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली:

  • नेतृत्व: पोलीस निरीक्षक अशोक लांडे (स्थानिक गुन्हे शाखा)

  • पथक: पोनि आनंद पिदूरकर, पो.उप.नि. रोहित कुदळे, विष्णुसंत राठोड, शिवाजी घुगे, सुधीर बावणे, श्यामकुमार गावंडे, सचिन गायदेने, दिनेश कनोजिया, आणि महिला पोलीस अंमलदार प्रीती सोणारे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!