
स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल
स्थागूशा अमरावती ग्रामीणची जुगार विरोधी कारवाई; 10 जणांवर गुन्हे दाखल
शिरजगाव(अमरावती ग्रामीण) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या वाढत्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता. हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. म्हणुन पोलिसांचे पथक हे गस्तीस होते. गस्तीस असताना पोलिसांना माहिती मिळाली की, कोंडवर्धा गावच्या शेतशिवारात सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू आहे. त्या वर लगेच पोलीसांनी जाऊन छापा टाकला असता त्यांना जवळपास 3 लाखांचा मुद्देमाल हाती लागला.


या बाबत अधिक माहिती अशी की, दि.2 डिसेंबर रोजी शिरजगाव कसबा पोलिस स्टेशन परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहीतीदाराकडून मिळालेल्या खबरेवरून ग्राम कुऱ्हा ते कोंडवर्धा गावाच्या रोडवरील शेतशिवारात सार्वजनिक ठिकाणी 52 पत्तेवर एक्का बादशाह नावाचा
जुगार खेळणाऱ्यांवर पंचासमक्ष धाड टाकली. तेथे 06 आरोपीतांना ताब्यात घेऊन त्यांचे ताब्यातून 05 मोटर सायकल कि.2,40,000 रु, 05 मोबाईल फोन किं. 23,000 रु,व नगदी 35300 रुपये व जुगार साहित्यसह एकूण 2,98,350 रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपींना पळून गेलेल्या आरोपीचे नाव विचारले असता त्यांनी अजून 5 जणांची नावे सांगितली. या मध्ये 6 आरोपी आणि 4 फरार आरोपी अशा एकूण 10 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त केलेला माल आरोपीसह पुढील कार्यवाही करिता पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोनि-किरण वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ – सचिन पवार, पोलिस हवालदार – युवराज,मानमोठे,स्वप्निल तंवर,रविन्द्र वर्हाडे, पोलिस शिपाई – सागर नाठे, चालक पोलिस शिपाई – गेठे यांनी केली आहे.



