स्थागुशा पथकाने सरमसपुरा पोलिस स्टेशन हद्दीतुन जप्त केली धारदार शस्त्रे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्थानिक गुन्हे शाखेने अचलपुर सरमसपुरा येथुन धारदार शस्त्रे केली जप्त, आरोपी ताब्यात….

अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
अमरावती जिल्हयाचे पोलिस अधिक्षक  विशाल आनंद यांनी अमरावती जिल्हयात अवैधरित्या विनापरवाना शस्त्रे बाळगणा-याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत.त्याअनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दिनांक ८ रोजी पोलिस स्टेशन
सरमसपुरा येथे पेटोलिंग करीत असता गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली कि, सुबान खाँ मोहम्मद खाँ रा. मेहराबपुरा अचलपुर याने सरमसपुरा, अचलपुर येथील नवबाग शेतशिवाराचे
शेतामध्ये असणारे झोपडीत अवैधरित्या विनापरवाना धारदार चाकु सुरे, भाले लपुन ठेवले आहे. अशा गोपनिय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने पंचासह सरमसपुरा,अचलपुरसयेथील नवबाग शेतशिवारातील सुबान खॉ मोहम्मद खाँ याचे शेतातील झोपडीवर जावुन पाहणी केली असता तेथे सुबान खॉ हा हजर मिळुन आला. त्यास ताब्यात घेवुन त्याचे झोपडीचीसपंचासमक्ष पाहणी केली असता खालील प्रमाणे शस्त्रे मिळून आली.
०१) एक लाकडी मुठ असलेला धारदार चाकु
०२) एक लोखंडी दांडा असलेला भाला,
०३) एक लोखंडी मुठ असलेला मोठा कोयता,
०४) एक लोखंडी मुठ असलेला छोटा कोयता,
०५) एक धारदार गुप्ती
असे एकुण ०५ धारदार शस्त्रे मिळुन आले. सदर आरोपीस शस्त्रे बाळगण्याचा उद्देश  विचारला असता त्याने उडवाउडवीचे उत्तरे देवुन कोणताही परवाना नसल्याचे सांगितल्याने सर्व शस्त्रे जप्त करण्यात येवुन आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन सरमसपुरा येथे कलम ४,२५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला असुन आरोपी यास पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन सरमसपुरा यांचे ताब्यात देण्यात आले असुन तपासा दरम्यान अधिक शस्त्रे मिळुन येण्याची शक्यता आहे.
सदरची कारवाई विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अम.ग्रा.यांचे नेतृत्वात सहा पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक हर्षद घुसे यांनी केली.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!