शेतपंप व शेतीतील साहीत्य चोरुन विकणारे नांदगाव खंडेश्वर पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नांदगाव खंडेश्वर( अमरावती ग्रामीण) – अमरावती ग्रामिण जिल्हयात अलीकडील काळात घडलेल्या शेतीसाहीत्य चोरींचा आढावा घेवून सदर चोरींच्या घटनातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघडकीस आणण्याबाबत विशाल आंनद, पोलिस अधिक्षक,  यांनी अधिनस्थ सर्व पो.स्टे.प्रभारी अधिकारी व अंमलदार यांना आदेशित केले होते,त्यानुसार पोलिस स्टेशन नांदगांव खंडेश्वर यांचे पथक हे पो.स्टे.हद्दीत पेट्रोलींग करित असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती प्राप्त झाली की, दोन इसम हे एम.एच.२७/डी.जे.३२०५ या दुचाकीवर चांदुर रेल्वे-नांदगांव खंडेश्वर रोडने फिरत असुन त्यांचे जवळ शेतातील मोटरपंप असुन ते विक्रीच्या उद्देशाने चौकशी करित आहेत. प्राप्त माहीतीची शहानिशा करून सदर पथकाने वरील मार्गावर नाकाबंदी करून सदर दुचाकीस थांबवीले असता दुचाकी वरील इसम
१) रामेश्वर लक्ष्मणराव खंडाते,

२) विकास हरीदास मारब्दे दो.रा.येरड





यांचे ताब्यात जुनी वापरते टेक्समो कंपनीचे शेतातील मोटर पंप मिळुन आले, सदर पंप बाबत त्यांना विचारपुस केली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस करण्यात आली असता नमुद इसमांनी सदर मोटर पंप
दि.१०/१०/२०२३ रोजी किशोर जबरीलाल जैन,रा.नांदगांव (खं ) यांचे शेतातुन चोरी केली असल्याची कबुली दिली असुन सदर मोटरपंपाची विल्हेवाट लावण्याचे उद्देशाने फिरत असल्याचे निष्पन्न झाले. सदर चोरीचे घटनेचे अनुषंगाने पो.स्टे.नांदगांव (खंडेश्वर ) येथे अप.क्रं.४३१/२३ कलम ३७९ भा.दं.वी.चा यापुर्वीच नोंद असुन
सदर गुन्हयात वरील दोन्ही आरोपीतांना चोरीचे मोटारपंप व गुन्हयात वापरलेली मोटर सायकल असा एकुण ५५,०००/- च्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. सदर आरोपीतांकडुन शेती साहीत्य चोरीच्या आणखी काही घटनांचा उलगडा होण्याची शक्यता असुन पुढील तपास नांदगांव खंडेश्वर पोलीस करित आहेत.
सदरची कार्यवाही .विशाल आंनद,पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण,विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा,सुर्यकांत  जगदाळे, उप-विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शना विशाल पोळकर,ठाणेदार,पो.स्टे.नांदगांव खंडेश्वर पोलिस अंमलदार राजेश हीरेकर, सतिश राठोड, निखिल मेटे, प्रशांत पोकळे, राहुल गजभिये यांचे पथकाने केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!