कत्तलीकरीता जाणार्या बैलांची सुटका करुन ब्राह्मणवाडा पोलिसांनी दिले जिवनदान..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

कत्तलीकरीता जाणार्या गोवंशीय जनावर(बैल) याना  ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी दिले जिवनदान,एका आरोपीस घेतले ताब्यात..

ब्राह्मणवाडा थडी(अमरावती) प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि.(२७) रोजी पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथील पथक अवैध धंदे कार्यवाही तसेच रेकॅार्डवरील गुन्हेगार चेक करण्यासाठी परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या माहितीवरून एक इसम हा पुर्णा नदीचे धरण ते विश्रोळी रोडने गोवंश कत्तली व विक्री करण्याच्या उददेशाने ब्राम्हणवाडा थडी कडे घेवुन येत आहे





अशा गोपनीय माहिती मिळाल्यावरून पोलिस पथकासह विश्रोळी ते धरणाकडे जाणारा रत्यावर सापळा लावला असता. एक इसम हा गोंवश घेवुन येत असतांना दिसला त्यास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव ) मोतीराम रामलाल बारस्कर वय ३६ वर्ष रा. देडपानी ता. भैसदेही जि. बैतुल (मध्यप्रदेश) असे सांगीतले त्सास अधीक विचारपुस केली असता सदरचे गोवंश(बैल) हे शेख इब्राईम रा. पठाणपुरा ब्राम्हणवाडा थडी याचे असल्याचे सांगीतले यावरुन मोतीलाल बारस्कर यास ताब्यात घेऊन त्याचे ताब्यातुन ४ गोवंश बैल एकुण किंमत ८०,००० /- रू. चा माल मिळुन आल्याने सदर माल जप्त करुन त्याचेविरुध्द पोलिस स्टेशन ब्राह्मणवाडा थडी येथे अप क्र २६६ / २०२४ कलम ५ (ए) ५ ( ब ) ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन १ आरोपी ताब्यात घेण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही ही पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत साहेब,उपविभागिय पोलिस अधिकारी,अचलपुर अतुलकुमार नवगिरे यांचे मार्गदर्शनात सहा. पो. नि. उल्हास ए.राठोड ठाणेदार पोलिस स्टेशन ब्राम्हणवाडा थडी सहा. पोउपनि साहेबराव राजस, पोहवा राजेश तायडे, पोशि.राजु मरस्कोल्हे पो. ठाणे ब्राम्हणवाडा थडी यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!