
कत्तलीकरीता जाणाऱ्या गोवंश वाहतुक करणारे तळेगाव दशासर पोलिसांचे ताब्यात…
कत्तलीकरीता जाणारी अवैध गोवंश तस्करी विरूध्द तळेगाव दशासर पोलीसांची धडक कार्यवाही…..
तळेगाव(दशासर)अमरावती प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती ग्रामिण जिल्हयाचे पोलीस स्टेशन हद्दीतुन अवैधरित्या गोवंश तस्करी होत असल्याचे मागील काही काळापासुन दाखल गुन्हयांवरून निष्पन्न झालेले आहे. सदर अवैध गोवंश तस्करीवर पुर्णतः आळा लावण्याबाबत तसेच अशा प्रकरणातील जप्त वाहनांवर व आरोपींवर प्रभावी कार्यवाही करण्यात बाबत पोलिस अधिक्षक विशाल आनंद, यांनी अधिनस्थ पोलिस अधिकारी व अमंलदार यांना यापुर्वीच आदेशित केलेले आहे.



त्याअनुषंगाने दि.३०/०३/२०२४ रोजी सपोनि रामेश्वर धोंडगे ,ठाणेदार पो.स्टे. तळेगांव दशासर यांना गुप्त बातमी मिळाली
धामणगांव रेल्वे कडुन एक कथीया रंगाच्या आयसर कन्टेंनर मध्ये निर्दयतेने जनावर घेउन देवगांव कडे येत आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्याने पोलिस पथकासह जवळा फाटा येथे नाकाबंदी केली असता, नमुद कथीया रंगाचा आयसर कन्टेंनर येताना दिसताच त्यास थांबवीले असता सदर वाहनांतुन आरोपी १) अब्दुल राजीक अब्दुल खालीद, वय ३० वर्ष रा. पठाणपुरा मुर्तीजापुर जिल्हा अकोला २) मो. शोऐब मो. सलीम, वय २३ वर्ष रा. पठाणपुरा मुर्तीजापुर जिल्हा अकोला ३) सैय्यद वहीद सैय्यद जमीर, वय ४२ वर्ष रा. बार्शी टाकळी जिल्हा अकोला
यांचे ताब्यातुन एकुण ४६ गोवंश, ०१ कन्टेंनर वाहन असा एकुण २६,६५,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नमुद आरोपीतां विरूध्द प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतिबंध अधिनियमान्वये कार्यवाही करण्यात आली असुन पुढील तपास तळेगांव दशासर पोलीस करित आहेत.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत अमरावती ग्रा.उपविभागिय पोलिस अधिकारी,चांदुर रेल्वे आशित कांबळे, यांचे मार्गदर्शनाखाली रामेश्वर धोंडगे, स.पो.नि. तळेगांव दशासर, महामार्ग पोलिस मदत केंन्द्र येथील राजेश खंदाडे, स.पो.नि.,पो.उप.नि. सचिन राठोड, पो.स्टे. तळेगांव दशासर येथील पोलिस अमंलदार भारत गवई, गौतम गवई, पवन अलोने,सचिन गायधने, संदेश चव्हाण, मपोशि प्रिया भिसे,पोशि सुरज इपर, महामार्ग पोलीस मदत केंन्द्र येथील अमलदार नरेंन्द्र मेश्राम, मनोज ढेरे, गजानन हरणे, मंगेश खंडारे, चालक पो.स्टे. तळेगांव दशासर पंकज शेंडे यांचे पथकाने केली आहे.




