खत चोरणार्या तीन आरोपींना दत्तपुर(धामनगाव) पोलिसांनी २४ तासात घेतले ताब्यात….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

खत चोरणार्या चोरट्यांना काही तासाचे आ दत्तापुर पोलिसांनी ताब्यात घेऊन,मुद्देमाल केला हस्तगत…

धामनगाव रेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन दत्तापुर येथे दि. १४ मार्च रोजी मयुर विजय गहनेवार रा. पतंग मार्केट चौक दत्तापुर यांनी तक्रार दिली की, दि. १३/०३/२५ चे रात्री दरम्यान मालधक्का मध्ये आलेला खताचा माल ट्रकमध्ये भरून जुना धामणगाव येथील बालाजी मंगल कार्यालय चे पाठीमागे असलेल्या गोडाउन चे समोर ट्रक उभा करून ठेवला होता. सदर ट्रकमधुन कोरोमंडळ कंपनीच्या ५० नग खताच्या बेंगा कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या वरून पो.स्टे. दत्तापुर येथे अप क्र. ६१/२०२५ कलम ३०३ (२) भा.न्या.स. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता





त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास करीत असताना सदर आरोपी ही गावातीलच असल्याची माहीती मिळाल्याने आरोपी १) मोरेश्वर लक्ष्मणराव भलावी वय ४१ वर्ष, २) आशिष गजानन बनकर वय २८ वर्ष दोन्ही रा शिवाजी वार्ड, धामणगाव रेल्वे जि. अमरावती यांना निष्पन्न करुन ताब्यात घेवून गुन्हयाबाबत विचारपूस केली असता दोन्ही आरोपीनी गुन्हा केल्याची कबुली दिली. सदर गुन्हयात चोरी केलेला माल परसोडी येथील शेतशिवारात लपवून ठेवल्याचे आरोपींनी सांगितले यावरून नमूद ठिकाणी जावून चोरीस गेलेला मुद्येमाल ५० नग खताच्या बॅगा किंमत अंदाजे ६८,०००/- गुन्हयात वापरलेले वाहन किंमत अंदाजे ५,००,०००/- असा एकूण ५,६८,०००/- चा माल जप्त करण्यात आला. पुढील तपास दत्तापूर पोलिस करीत आहेत.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागीय पोलीस अधिकारी, चांदुर रेल्वे अनिल पवार, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गिरीश ताथोड, ठाणेदार, पो.स्टे. दत्तापुर यांचे नेतृत्वात अंमलदार सागर कदम, नवनाथ खेडकर, अरूण पवार, पवन महाजन यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!